Breaking News

वर्धा जिल्हा भाजपा व हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने बालाजी मंदीर, भवानी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, अष्टभुजा मंदिर सहीत इतरही मंदीरात घंटानाद आंदोलन

Advertisements

 

महाराष्ट्रातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे भाविकांसाठी उघडी करावीत – खासदार रामदास तडस

Advertisements

वर्धा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेली राज्यातली मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मिशन बिगेन अंतर्गत लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर अनेक राज्यातील प्रमुख देवस्थानं भाविकांसाठी खुली करण्यात आली. मात्र राज्यात अद्यापही मंदिर अथवा धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील मंदिरं उघडण्याची सुबुद्धी सरकारला मिळावी आणि झोपी गेलेल्या सरकारला जाग यावी, यासाठी भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून दिनांक 29 आॅगस्ट राज्यव्यापी घंटानाद करण्यात आले होत. परंतु वर्धा, देवळी येथे 29 व 30 आॅगस्ट ला जनता कफ्र्यु असल्यामुळे आज वर्धा येथील बालाजी मंदीरामध्येखासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन करण्यात आले, यावेळी. सरकारला जाग यावी, यासाठी घंटानाद आणि डमरु नाद करण्यात येत असून दार उघड, उद्धवा दार उघड अशी घोषणाबाजी करण्यात आली.

Advertisements

      कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वागळता इतर सर्व सेवा, व्यवहारांवर बंदी घालण्यात आली. यामध्ये मंदिरांचाही समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील मंदिरे बंद आहेत. राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत आतापर्यंत अनेक उपक्रमांना संमती दिली आहे. यामध्ये राज्यातील माॅल, मास, मदिरा या सह सर्व काही चालू केले आहे. परंतु संताजी भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरी ला मात्र बंदिस्त ठेवले आहे, राज्यात दारूची दुकाने, मॉल्स सुरु करण्यात कोरोनाची भीती नाही, मग केवळ प्रार्थना  स्थळांमध्ये  कोरोनाची भीती का असा प्रश्न उपस्थित होत आहे, या संतभूमी महाराष्ट्रात मद्य मुबलक सुरु ठेवण्यात आले आणि भजन पूजन करणा-या भाविक भक्तावर गुन्हे दाखल होत आहे. केन्द्र सरकारने 4 जुन 2020 च्या परीपत्रकातुन देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थान सुरु झालेली आहे. परंतु महाराष्ट्रात मंदीर व धार्मिक स्थळाला बंदीस्त करण्यात आलेले आहे. राज्यात सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम व अटी शर्तीसह देवस्थान व धार्मिक स्थळ सुरु करण्याची तसेच भजन, किर्तन व पूजन करण्याची मागणी भाविक भक्ताकडून होत आहे, राज्यसरकारने मंदीर व धार्मिक स्थळ सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी यावेळी खासदार रामदास तडस यांनी यावेळी केली.

      आज स्थानिक वर्धा येथील बालाजी मंदीरामध्ये भाजपा व हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने घटनांद आंदोलन करण्यात आले, वर्धा भाजपा तर्फे ‘‘दार उघड उद्धवा दार उघड’’ ‘‘दारु नको भक्तीचे दार उघड’’, ‘‘मदिरा चालू मंदीर बंद’’, ‘‘उध्दवा तुझा कारभारच धुद’’ं, ‘‘भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल’’ अशा घोषणा देत मंदिरांसमोर घंटानाद करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व मंदिरे भाविकांसाठी उघडी करावीत, अशी आग्रही मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. यावेळी खासदार रामदास तडस, सयाजी महाराज, मयुर महाराज, लाभेसर, धाबेसर, अटल पांडे, अविनाश देव, मिलिंद भेंडे, पवन परियाल, प्रशांत झलके, घनश्याम अहेरी, नितिन चुडिवाले, लिलाधरजी सराफ, रविंद्र सोनी, मोहीत उमाटे, अभिषेक त्रिवेदी, रंजीत भारद्वाज, मनोज भुतडा, अमित ठाकुर उपस्थित होते, वर्धा जिल्हयातील भवानी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, अष्टभुजा मंदिर सहीत इतर  10 मंदीरात महीला मोर्चा, उत्तर भारतीय आघाडी, व्यापारी आघाडी व्दारा घंटा आंदोलन करण्यात आले.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

दिल्ली में आज नहीं हो पाएंगे मेयर चुनाव? AAP ने कहा- पुरानी परंपरा तोड़ना चाहते हैं उपराज्यपाल

दिल्ली में आज नहीं हो पाएंगे मेयर चुनाव? AAP ने कहा- पुरानी परंपरा तोड़ना चाहते …

5 जिल्हाधिकऱ्यांची ‘ईडी’कडून चौकशी

पाच जिल्हाधिकाऱ्यांची सक्तवसुली संचालनालयापुढे (ईडी) चौकशी झाली. अवैध वाळू उपसा प्रकरणात चौकशी झाली आहे. यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *