Breaking News

वर्धा : कोरोना मुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ मोहिम यशस्वी करा – मुख्यमंत्री

Advertisements

Ø नागपूर विभागातील पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

Advertisements

Ø कोरोना आजार संदर्भातील सर्व वैद्यकीय प्रस्ताव मान्य केले जातील*

Advertisements

          वर्धा प्रतिनिधी : दि. 27 : महाराष्ट्रातील आरोग्य संदर्भातील वस्तुस्थितीचा नकाशा तयार करण्यासाठी, नेमकी स्थिती स्पष्ट होण्यासाठी, पर्यायाने महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्यासाठी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘मोहीम यशस्वी करायची आहे. महाराष्ट्राला आरोग्य साक्षर करणाऱ्या या मोहिमेत प्रत्येक घटकाने हिरिरीने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

नागपूर विभागातील पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना कोरोना संक्रमणाने महाराष्ट्रात गंभीर रूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत केवळ कायदे व दंड करून मार्ग निघणार नाही. त्यामुळे घरोघरी आरोग्य साक्षरता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

           यावेळी  वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार,  भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, वर्धेतून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी उपस्थित होते.

      सर्व जिल्ह्यातील या मोहिमेबद्दलची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातून कोरोना विषयक आलेल्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

      कोरोना संदर्भातील सर्व उपाययोजना करता येईल. मात्र रुग्णांची संख्या वाढल्यानंतर लस येईपर्यंत त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर कुठून आणणार? प्रत्येक सुविधांसाठी मर्यादा आहेत. त्यामुळे  प्रत्येक घराघरात जाऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी, माझे कुटुंब – माझी जबाबदारी ही मोहीम अतिशय सक्रियतेने राबविणे महाराष्ट्राच्या हिताचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    कायदे व दंड करून यातून मार्ग निघणार नाही. त्यामुळे घरोघरी जाऊन चौकशी करणे, प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणे, कोरोना विषयक चाचण्यांमध्ये गुणात्मक व संख्यात्मक वाढ करणे, डॉक्टरांसोबत चर्चा करून आरोग्यविषयक सुविधा सुधारणे, आदी बाबींवर लक्ष वेधण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपले स्वप्न कोरोना मुक्त महाराष्ट्र आहे. आगामी काळात सर्वाधिक कोरोना बाधितांचा महाराष्ट्र नव्हे तर कोरोना मुक्त महाराष्ट्र, असे चित्र राज्याचे निर्माण झाले पाहिजे. यासाठीच ही मोहीम आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी सर्वानी प्रयत्न करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

       यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या थँक्यू आशाताई मोहिमेला राज्यव्यापी करण्याबाबतचे निर्देश दिले. प्रत्येक जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या प्रयोगाला राज्यव्यापी करण्यात यावे, प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार – प्रसिद्धी मोहीम राबविण्यात यावी, सण-उत्सव यासाठी नागरिक बाहेर पडणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास आदीनी देखील सूचना केल्यात.

वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  विवेक भिमनवार यांनी जिल्ह्यात दिवसागणिक पुढे आलेल्या बाधितांची व प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची थोडक्यात माहिती सादर केली.

         यावेळी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी वर्धा जिल्ह्याची माहिती सांगितली.  मे महिन्यापासून तर आजपर्यंत जिल्ह्यातील तीन लाख लोकांना आरोग्य पथकामार्फत दोनदा भेट देण्यात आली आहे . जिल्ह्यात कोरोना तपासणी सोबतच मधुमेह,टीबी, एचआयव्ही,आयएलआय व सारी रुग्णांच्या तपासणी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मास्क न घालणाऱ्या लोकांवर  दंडात्मक कारवाई करणे सुरु आहे.

जिल्ह्यात खादी उद्योग मोठ्या प्रमाणात असून खादीचे 30 हजार मास्क तयार करण्यात आले आहे त्यावर माझे कुटुंब माझी जबाबदारी हा लोगो प्रिंट करून वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

राज ठाकरेंनी दिला BJP ला पाठिंबा

मला शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर अमित शाह यांच्या भेटीनंतर काही होत नाही त्यांना लक्षात …

काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. राजू पारवे हे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *