Breaking News

शुल्लक कारणावरून चाकूने भोसकून केले गंभीर जखमी

दोन्ही आरोपींना पोलिसांनी केले अटक

वर्धा :- समुद्रपुर:तालुक्यातील मंगरुळ गावात शुल्लक कारणावरून वाद घालून दोद्यांनी एकाला चाकूने भोसकून जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीला आली आहे.या संबंध गिरड पोलीसांनी अवद्या काही तासांतच दोन्ही आरोपींना अटक केली आहे. जखमीचे नाव शत्रुघ्न विठ्ठल भोयर वय २५ वर्ष तर आरोपीचे नाव तुळशीराम मंगरुजी भोयर ५६ वर्ष व त्यांचा मुलगा नागेश तुळशीराम भोयर १९ वर्ष असे आहे.
प्राप्त माहितीनुसार शनिवारी सायंकाळच्या सुमारास मंगरुळ येथिल शत्रुघ्न विठ्ठल भोयर २५ वर्ष यांच्या शेजारी राहणाऱ्या तुळशीराम मंगरुजी भोयर ५६ वर्ष व त्यांचा मुलगा नागेश तुळशीराम भोयर १९ वर्ष या बापलेक घरी मोहाची दारू काढत होते.या संबंध शत्रुघ्न भोयर याने काही दिवसांपूर्वी गावातील दारू बंदी मंडळाकडे तक्रार केली होती. तेव्हा पासून ते धत्रुघ्न याचा मनात राग धरून होते.तिन दिवसांपूर्वी शत्रुघ्न च्या आईने तुळशीराम भोयर यांचे घरासमोर खरखटे पाणी फेकले होते.यावेळी तुळशीराम यांनी तीला आईला अश्लिल शिवीगाळ केली.यावरुन २५ सप्टेंबरला रात्री ८ वाजता शत्रुघ्न हा घरुन बाहेर जात असताना नागेश भोयर व तुळशीराम भोयर हे त्याला आडवे झाले व त्यांच्याशी वाद घालून तुळशीराम भोयर यांनी शत्रुघ्न भोयर यांचे दोन्ही हात पकडून ठेवले व त्याचा मुलगा नागेश भोयर याने जवळ असलेल्या चाकूने शत्रुघ्न भोयर याच्या पोटात वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.या वेळी शत्रुघ्न भोयर हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी भिमराव टेळे यांनी मंगरुड गावात जाऊन घटनेची माहिती जाणून घेतली.गिरड पोलिसांनी अवद्या काही तासांतच आरोपी तुळशीराम भोयर व नागेश भोयर यांना अटक केली.हि कारवाई गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार महैंद्र सुर्यवंशी पंचम कोटगिलवार, प्रशांत ठोंबरे राहुल मानकर, महैद्र गिरी,रवि घाटुरले यांनी केले असून पुढील तपास गिरड पोलिस करीत आहे.

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *