Breaking News

डेरा आंदोलनास जमात- ए- इस्लामी हिंद चा पाठिंबा

चंद्रपुर :- वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पाचशे कोविड योध्दे कंत्राटी कामगारांना 7 महिन्याच्या थकीत पगार व दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेले किमान वेतन लागू करण्यात यावे या मागण्यांसाठी ८ फेब्रुवारी २०२१ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन विकास कामगार संघाच्या नेतृत्वात मुलं-बाळ व कुटुंबासह कामगारांचे डेरा आंदोलनाल सुरू आहे.आज या आंदोलनाचा २१ वा दिवस होता. या आंदोलनाला स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेचे नेते राजुरा विधानसभेचे माजी आमदार एडवोकेट वामनराव चटप , राजूरा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष रमेश नळे नगरसेवक मधुकर चिंचोळकर तसेच अनिल बाळसराफ यांचे शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी आंदोलनकर्त्या कामगारांना संबोधित करताना एडवोकेट चटप यांनी सरकार नावाची यंत्रणा मुकी,बहिरी व आंधळी असते. आपल्या लोकशाहीमध्ये नाक दाबल्याशिवाय कोणी तोंड उघडत नाही.त्यामुळे जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन एक एकजुटीने रेटून धरा असे आवाहन करून कामगारांच्या मागण्या संदर्भात शासन व प्रशासनाच्या विविध स्तरावर पूर्ण ताकतीने लेखी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

जमात -ए -इस्लामी हिंद च्या शिष्टमंडळाने सुद्धा डेरा आंदोलनाच्‍या मंडपामध्ये भेट देऊन आपले समर्थन जाहीर केले.या शिष्टमंडळांमध्ये जमाते-ऐ-इस्लामी हिंद चंद्रपूर- गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष रफिक कुरेशी, खलील शेख , मुतांजीर अहमद खान व मजहर अली यांचा समावेश होता.डेरा आंदोलन म्हणजे कामगाराच्या हक्काची अनोखी लढाई असुन या आंदोलनाला सक्रिय समर्थन देण्याचे जमात-ए-इस्लामी हिंद चंद्रपूर-गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांनी यावेळी जाहीर केले.

About Vishwbharat

Check Also

हाईकोर्ट की शर्त मंजूर के साथ मुस्लिम पुलिस कर्मियों को दाढ़ी रखने की अनुमति

हाईकोर्ट की शर्त मंजूर के साथ मुस्लिम पुलिस कर्मियों को दाढ़ी रखने की अनुमति टेकचंद्र …

मौदा तालुक्यातील झुल्लर येथे कंपनीत ब्लास्ट : 1 ठार, 9 जखमी

नागपूर : मौदा तालुक्यातील झुल्लर गावातील एका खासगी कंपनीत आज सकाळी ब्लास्ट झाला. यात एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *