Breaking News

शॉक! वीज बिल आणखी महाग होणार

विश्व भारत ऑनलाईन :

राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला मोठा शॉक मिळण्याची शक्यता आहे. वीज आणखी महाग होऊ शकते.दरवाढीसाठी महावितरणने गुरुवारी राज्य विद्युत नियामक आयोगाशी चर्चा केली. यात वीज दरवाढीचा प्रस्तावावर चर्चा झाली. त्यामुळे आता भविष्यात पुन्हा वीज दरवाढ होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे याचा परिणाम हा विद्युत बिलावर दिसून येणार आहे. महागाईत आता वीज बिलाचा ‘शॉक’ बसणार आहे.

वीज दरवाढीबाबत आयोगाने महावितरणला याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. कोविड काळात लॉकडाऊन आणि संक्रमण यामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती महावितरणे सांगितले आहे. तसेच याकाळात महावितरणची थकबाकी वाढली. पण कंपनी वसुली करु शकलेली नाही. कोविड काळात 70 हजार कोटी रुपयांची एकूण थकबाकी होती. आजही यात कमी झालेली नाही, असे महावितरण कंपनीचे म्हणणे आहे.

महावितरण महागड्या वीज खरेदीचा हवाला देत आहे, पण कंपनी नागरिकांकडू अगोदरच इंधन समायोजन शुल्क वसूल करत आहे. मात्र थकबाकी वसूल करण्यात आलेल्या अपयशाचा फटका ग्राहकांना बसणार आहे. दरम्यान, विशेषबाब म्हणजे सरकारकडूनच वीज बिलाची जास्त थकबाकी आहे. पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची वीज बिलं महावितरणं वसूल केलेली नाहीत. सुमारे 24 कोटी रुपयांच्या पुढे ही थकबाकी असल्याचे समोर आले आहे

About विश्व भारत

Check Also

शिंदे-फडणवीस-पवार सरकारला निवडणूक आयोगाचा दणका

महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळांवर केलेल्या नियुक्त्या आणि घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीस निवडणूक आयोगाने …

पूर्व CM कमलनाथ व पूर्व MP नकुलनाथ की युवाओं के लिये सार्थक पहल

पूर्व CM कमलनाथ व पूर्व MP नकुलनाथ की युवाओं के लिये सार्थक पहल टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *