शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट शिंदे गटावर नाराजी व्यक्त केल्याने ते पुन्हा ठाकरे गटात जाणार का यावर चर्चा रंगली होती. आमदार गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी एका शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यांनी शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची कबुलीही दिली.
यावेळी गायकवाड म्हणाले की, मला मुंबई मंत्रालय येथून एक फोन आला आणि सिंचन योजना संदर्भात चुकीची माहिती देऊन बोलत होता. त्यामुळे अश्या लोकांना त्यांच्याच भाषात उत्तर मी दिले.मी खानदानी शेतकरी असून माझ्यासाठी तो सिंचन प्रकल्प महत्वकांक्षी आहे. त्यासाठी निधी मंजूर झाला.मी स्वतः बैठका घेतल्या आहेत. मात्र त्या सिंचन प्रकल्प संदर्भात मला फोनवरून चुकीची माहिती बोदवडचा शेतकरी देत होता. त्यामुळे मी उत्तर दिले. यावर वायरल झालेल्या ऑडीओक्लिप मध्ये दिलेल्या शिवीगाळ संदर्भात कबुली आमदार गायकवाड यांनी दिली.
आमदार संजय गायकवाड हे एका शेतकऱ्याला फोनवरून शिवीगाळ करतानाची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. अनिल गंगित्रे असे त्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी उपसा जलसिंचन योजनेबाबत बोलायला गंगित्रे यांनी फोन केल्याचे समजते.