Breaking News

२००० रुपयांची नोट घरबसल्या बदलता येणार काय?प्रक्रिया कोणती?

Advertisements

भारतीय रिझर्व्ह बँक ने १९ मे रोजी संध्याकाळी २००० रुपयांच्या नोटेबाबत मोठी घोषणा केली. घोषणेनंतर लोकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१६ मध्ये जेव्हा सरकारने नोटाबंदीची घोषणा केली. लोकांना नोटा बदलण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागले होते. यावेळी नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार २००० रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध राहतील.

जर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन २००० रुपयांची नोट जमा केली, तर त्यात कोणतीही अडचण नाही, परंतु तुमच्या खात्याचे केवायसी असणे आवश्यक आहे. तुम्ही बँकेचे ग्राहक नसले तरीही तुम्ही नोटा बदलून घेऊ शकता. तुम्ही एकावेळी फक्त २ हजारांच्या १० नोटा म्हणजेच २०००० रुपयांची बदली करू शकता. नोट बदलण्याची प्रक्रिया २३ मे २०२३ पासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे.

Advertisements

नोटा कुठे बदलू शकतो?

तुम्ही बँकेत जाऊन नोट बदलून घेऊ शकता. याबरोबरच तुम्ही RBI च्या १६ प्रादेशिक कार्यालयात जाऊन नोट बदलून घेऊ शकता. दुर्गम भागात म्हणजे ज्या भागात बँक नाही किंवा लांबच्या अंतरावर बँक आहे, त्या ठिकाणचे लोक रिमोट व्हॅनद्वारेही नोटा बदलून घेऊ शकतात. अशा परिस्थितीत लोकांना बँकेत जाण्याची गरज नाही, अशी महत्त्वाची माहितीही आरबीआयनं दिली आहे.

Advertisements

घरात राहूनही नोट बदलता येऊ शकते का?

तुम्ही घरी बसूनही नोटा बदलू शकता. जर तुम्हाला बँकेत जाऊन नोटा बदलणे शक्य नसेल, तर तुम्ही घरी बसून नोटा बदलून घेऊ शकता. बँक मित्र तुमच्या घरी येऊन नोटा बदलतील, असे आरबीआयने म्हटले आहे. या सुविधेद्वारे तुम्ही दररोज ४००० म्हणजे २००० रुपयांच्या दोनच नोटा बदलू शकता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘ईएमआय’ वाढणार?RBI ची महागाईवर मोठी घोषणा

भारतीय रिझर्व्ह बँकने तीन दिवसीय MPC बैठकीतील निर्णय जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या …

‘व्हाट्सअँप’द्वारे मिळणार १० लाखांचं कर्ज : फक्त मेसेज करा, मोबाईल क्रमांक जाणून घ्या…!

गरजूला कर्जासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागतात. तसेच झेरॉक्स आणि विविध कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत ठेवाव्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *