Breaking News

73 वाघांच्या मृत्यूची चौकशी कधी होणार? राज्यात 115 वाघांचा मृत्यू

Advertisements

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच वन विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत वाघाची शिकार करण्यासाठी कुख्यात बावरिया टोळीतील १६ जणांना पकडले.२८ जून रोजी गुवाहाटी येथे आसाम वन विभाग व पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईत हरियाणातील ३ व्यक्तींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून वाघाची कातडी व हाडेसुद्धा जप्त करण्यात आली होती. देशात २०१९ मधील २२ आणि २०२० मध्ये ७३ वाघांच्या मृत्यूचे प्रकरण अजून चौकशीत असल्याचे समोर आल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisements

तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून मिळालेली माहिती तपासास घेत वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो यांनी देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. या संदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ही आंतरराज्यीय टोळी असल्याचे ते म्हणाले. मागील तीन वर्षांत टीएटीआरमध्ये बहेलियांकडून वाघाच्या शिकारीची एकही घटना नसल्याचे रामगावकर यांनी सांगितले. आतापर्यंत ४० बहेलिया शिकाऱ्यांना पकडण्यात आल्याची माहिती रामगावकर यांनी दिली.

Advertisements

अटक करण्यात आलेल्या मध्ये ६ पुरुष, ५ स्त्रिया व ५ मुलांचा समावेश आहे. चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांजवळून प्राप्त माहितीच्या आधारे करीमनगर, धुळे, व तेलंगणातून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सर्व संशयित हरियाणा व पंजाबातील असल्याचे निष्पन्न झाले. या टोळक्याने देशातील अनेक भागात वाघांची शिकार केली असल्याची माहिती पुढे आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहे. या टोळीवरील कारवाईमुळे चंद्रपूर, गडचिरोली व तेलंगणातील वाघांची शिकार करण्याचा मोठा कट वन विभागाने हाणून पाडला आहे. या संपूर्ण कारवाईस तेलंगण वन विभागाचे मोठे मार्गदर्शन लाभले आहे. या शिकारप्रकरणी आरोपींची संख्या वाढू शकते, अशी माहिती क्षेत्र संचालक ताडोबा जितेंद्र रामगावकर यांनी दिली. सदरची कारवाई प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महिप गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, जितेंद्र रामगावकर, रमेशकुमार, चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह आदींनी केली.

वाघ मृत्यू प्रकरणातील ७२ टक्के प्रकरणे बंद

वाघ मृत्यू प्रकरणातील ७२.०३% प्रकरणे बंद करण्यात आलेली आहेत, तर २७.९७% प्रकरणे प्रलंबित आहेत. एनटीसीएच्या वेबसाइटवरील माहितीनुसार देशभरात २०१२ मध्ये २३, २०१३ : २९, २०१४ :१३, २०१५ : १२, २०१६ : २५, २०१७ : ३३, २०१८ : ३४, २०१९ : १७, २०२० : ०७ वाघ मृत्यूचा समावेश आहे. २०१९ मध्ये २२ आणि २०२० मध्ये ७३ वाघ मृत्यू प्रकरणे अजून चौकशीत आहे, तर २०२३ मध्ये महाराष्ट्रात जंगलाबाहेर २१ वाघांचा मृत्यू झाला.

२०२२ मध्ये झाला २९ वाघांचा मृत्यू

वन विभागाच्या अधिकृत नोंदीनुसार महाराष्ट्रात २०१८ मध्ये १९ मृत्यू झाले. यात शिकार आणि विषबाधेने २ आणि १ वाघाची शिकार झाली. २०१९ मध्ये एकूण १७ वाघ मृत्यू झाले. यामध्ये सापळ्यात अडकून १ आणि शिकार तसेच विषबाधेमुळे ३ वाघ मृत्यू झाले. २०२० मध्ये १८ वाघांचा मृत्यू झाला. यातील ५ वाघांची शिकार करण्यात आली. २०२१ मध्ये ३२ वाघांचे मृत्यू झाले. यापैकी ६ वाघांची शिकार झाली. २०२२ मध्ये एकूण २९ वाघांचा मृत्यू झाला. यातील ३ वाघांची शिकार करण्यात आली. २०१२ ते जुलै २०२२ पर्यंत मध्य प्रदेशात २७०, महाराष्ट्रात १८४, कर्नाटक १५० आणि उत्तराखंडमध्ये ९८ वाघांचा मृत्यू

असे आहेत बावरिया

एक पारधी किंवा बावरिया (त्याला भीमा, खेरू, कुट्टू, काहीही म्हणा) वाघाला त्याच्याच प्रदेशात जाऊन मारतो. वाघ जातो त्याच वाटेने चालतो. पारधी आणि बावरी या दोघांनाही भारतातील जंगलात शिकार करण्याचा मोठा इतिहास आहे. शतकानुशतके वापरला जाणारा जबड्याचा सापळा किंवा खडका हे पारधी किंवा बावरिया टोळ्यांमधील व्यावसायिक वाघांच्या शिकारीसाठी सवयीचे आहे. भारतीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार २०१२ ते जुलै २०२२ पर्यत नैसर्गिक मृत्यू ते शिकारीपर्यंतच्या अनेकविध कारणांनी मध्य प्रदेशात २७०, तर महाराष्ट्रात १८४ वाघ मृत्युमुखी पडलेले आहेत. या खालोखाल कर्नाटक १५० आणि उत्तराखंडमध्ये ९८ वाघांचे मृत्यू झाले आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष चर्चा

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष …

निर्वाचन आयोग पर हेराफेरी का संदेह : मतदान के अंतिम आंकड़े जारी करने में विलंब

इस आम चुनाव के पहले और दूसरे चरण में कम मतदान के आंकड़े आए, तो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *