Breaking News

नागपूरकर अभिनेत्री केतकी माटेगावकर हॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात

नागपूरकर असलेली अभिनेत्री केतकी माटेगावकर सध्या ‘अंकुश’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ओमकार फिल्म क्रिएशन्स निर्मिती संस्थेच्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिली निर्मिती असलेला केतकीचा हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात केतकीबरोबर बरेच मराठीतील दिग्गज कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सध्या ती ‘अंकुश’ चित्रपटाच प्रमोशन करताना दिसत आहे.

नुकतीच केतकी ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलच्या रॅपिड फायर सेगमेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला विविध प्रश्न विचारण्यात आले. याची उत्तर तिनं दिलखुलासपणे दिली. केतकी यावेळी विचारलं की, “कोणाला फिल्मी स्टाइलमध्ये प्रपोज करायला आवडेल?” यावर केतकी म्हणाली की, “माझा जॉनी डेप क्रश आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करते. मला तो भयंकर आवडतो. मला त्याचं काम आवडतं. त्यामुळे मी त्याला हॉलीवूड किंवा बॉलीवूड नाही तर मराठी अंदाजात प्रपोज करेन.”

केतकीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं यापूर्वी बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. ‘तानी’, ‘शाळा’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमपास’, ‘फुंतरू’ यांसारख्या चित्रपटात ती झळकली आहे. तसेच ती येत्या काळात ‘मीरा’ या चित्रपटात देखील पाहायला मिळेल. या चित्रपटात तिनं अभिनेता प्रसाद ओकबरोबर काम केलं आहे. पण अजूनपर्यंत हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याचा खुलासा झालेला नाही.

About विश्व भारत

Check Also

वादग्रस्त कृषिमंत्री कोकाटे यांनी दिला राजीनामा : धनंजय मुंडे नवे कृषिमंत्री, मुख्यमंत्री नाराज

सतत शेतकऱ्यांच्या विरोधात विधाने केल्याने वादग्रस्त ठरलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आता विधान परिषदेत ऑनलाइन …

नागपूर मेट्रो स्टेशनला आग : प्रवासी..!

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *