Breaking News

मराठ्यांची एक मागणी मान्य होऊ शकत नाही : देवेंद्र फडणवीस रोखठोक

Advertisements

मागील सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला यश आलं आहे. शुक्रवारी (२६ जानेवारी) मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं राजपत्र मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी (नवी मुंबई) येथे आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवलं. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे राज्य सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणीदेखील मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. ही मागणी राज्य सरकारने मागे घेतली आहे.

Advertisements

आंतरवाली सराटीसह राज्यभर विविध ठिकाणी मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. ते गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असं जरांगे यांनी जाहीर केलं. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सविस्तर माहिती दिली.

Advertisements

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आंदोलकांवर जिथे-जिथे गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतरवाली सराटी असो किंवा इतर ठिकाणचे गुन्हे निश्चितच मागे घेतले जातील. परंतु, घरं जाळल्याची प्रकरणं, पोलिसांवर थेट हल्ला, इतर वास्तूंची जाळपोळ करणे, बसेसची जाळपोळ करणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांसंदर्भात आपल्याला (राज्य सरकार) निर्णय घेता येत नाही. न्यायालयाच्या आदेशाशिवाय आपण यामध्ये काहीच करू शकत नाही, आपण ते गुन्हे मागे घेऊ शकत नाही. त्यामुळे ते गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. इतर गुन्हे आपण मागे घेत आहोत.

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, शिवसेनेच्या दसऱ्याच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाने तसा निर्णय घेतला आहे. काल मध्यरात्रीपर्यंत याविषयी चर्चा चालली होती. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात फार मेहनत घेतली आहे. चर्चेतून चांगला मार्ग काढला आहे. हा मार्ग सर्वांना मान्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत मी समाधान व्यक्त करतो.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पदभरती रखडली : आचारसंहितेनंतर नियुक्ती मिळणार?

राज्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. शासनाकडून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु आचारसंहितेमुळे नियुक्ती …

भ्रष्टाचार : जिल्हा परिषदेत एकाच कामाची दोन बिलं मंजूर

जिल्हा परिषदेतील आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालक्यातील काही कामांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *