मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी निधी खर्च झाला नसल्याने अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. “पैसे मिळूनही निधी खर्च केला जात नाही, एका महिन्यात सगळा निधी खर्च करू नका, कामे व्यवस्थित करा” अशी अजित पवार यांनी सूचना केली. “पाणी पुरवठा व्यतिरिक्त अन्य कामे आचारसंहिता लागल्यावर थांबतील. प्रशासकीय मान्यता इतर मान्यता लवकर घ्या, निवडणुक आचारसंहिता पुर्वी कामे सुरु करा” असं अजित पवार म्हणाले. संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांचा आढावा बैठक घेण्यासाठी अजित पवार आले होते.
बैठकीला Pwd विभागाचे मुख्य अभियंता न आल्याने अजित पवार यांनी झापले. “आम्ही इथे माशा मारायला आलो आहोत का ?. बैठकीला यायला चीफ इंजिनिअर यांना अडचण होते का? अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का? मी असला निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, तात्काळ बोलवून घ्या” असे आदेश अजित पवार यांनी दिले. पडेगाव पोलिस फायरिंग रेंज व वन विभाग यांची जागा संयुक्त मोजणी करुन हद्दी कायम कराव्यात, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना आदेश दिले. अजित पवार संतापले, त्यांनी अधिकाऱ्यांना झापलं. संभाजीनगर येथील नियोजन समिती सभागृहाची दुरावस्था, काही ठिकाणी फर्निचर तुटलेलं आहे. तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.