गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र निरीक्षक विजय रुपाणी म्हणाले, “विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आम्ही आमच्या सर्व आमदारांशी बोलू. प्रत्येकाचं मत विचारात घेऊ. या बैठकीत जे नाव किंवा प्रस्ताव आमच्यासमोर येईल त्यावर चर्चा करू. विधीमंडळ नेत्याची बिनविरोध निवड झाल्यानंतर उद्या शपथविधी होईल. सर्वसंमतीने ही निवड केली जाईल. जर दुसऱ्या एखाद्या आमदाराला विधीमंडळ नेता व्हायचं असेल तर त्यावरही चर्चा होईल”. यावेळी रुपाणी यांना विचारण्यात आलं की मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित झालं आहे का? मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा कधी होईल. यावर रुपाणी म्हणाले, अद्याप कोणाचंही नाव निश्चित झालेलं नाही. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नाव निश्चित केलं जाईल.
