लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना महाराष्ट्र अंनिस तर्फे अभिवादन
टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट
नागपूर जिल्हाचे कोराडी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कार्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शाखा अध्यक्ष ताराचंद पखिडे यांनी अण्णा भाऊंच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. कामगार नेते चैनदास भालादरे यांनी अण्णाभाऊंचे कामगार चळवळीत मोठे योगदान असल्याचे मत योग व्यक्त केले तर शाखा कार्याध्यक्ष बबन गायकवाड यांनी अण्णाभाऊंच्या खडतर जीवन प्रवासाचे जीवन चरित्र वाचून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.
जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे यांनी अण्णाभाऊंना पैशाअभावी वाटेगाव ते मुंबई प्रवास रेल्वे मालगाडीच्या डब्यातून करावा लागला व मुंबईतील दुकानाच्या नावाचे मोठमोठे फलक वाचून शिक्षणाची सुरुवात झाली अशा दुर्मिळ आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊंचा स्मृतिदिन साजरा केला. कार्यक्रमाला धम्मानंद सोनवणे यांच्या सह फुटपाथ दुकानदार व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार शाखा प्रधान सचिव विलास भालेराव यांनी केले.
विश्वभारत News Website