Breaking News

सार्वजनिक उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था चोख ठेवा : गृहमंत्री

नागपूर : येत्या काळात गणेशोत्सव, बकरी ईद आदी महत्त्वपूर्ण सार्वजनिक उत्सव सुरु होत आहेत. त्यादरम्यान राज्य शासनाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना निर्देशित केल्या असून, त्यांची अतिशय कडक अंमलबजावणी करताना कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आज कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.                                                                                       पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रकाश गजभिये, आमदार विकास ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस सहआयुक्त नीलेश भरणे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. व्ही. डी. पातूरकर, डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.                                                                                                        राज्याच्या तुलनेत नागपूर जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या, मृत्यूदर कमी असून, रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण चांगले आहे. येथील प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेने अतिशय चांगले काम केले असून यापुढेही योग्य समन्वय राखावा. प्रशासकीय यंत्रणेने प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केल्यानंतर अंमलबजावणी करताना लोकप्रतिनिधी व जनतेला विश्वासात घ्यावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ द्यावा. त्यामुळे नागरिकांचा प्रशासकीय यंत्रणेविरोधात रोष राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्यात.

कठोर लॉकडाऊन                                                                                                                                  राज्याच्या तुलनेत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी असली तरीही दरम्यानच्या काळात त्यामध्ये वाढ झाली आहे. ती नियंत्रित करण्यासाठी नागपूरकरांनी लॉकडाऊनचे नियम न पाळल्याबद्दल गृहमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढला असून, तो येत्या काळात नियंत्रित करण्यासाठी प्रशासकीय व पोलीस यंत्रणेने कठोर लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

About Vishwbharat

Check Also

वादग्रस्त कृषिमंत्री कोकाटे यांनी दिला राजीनामा : धनंजय मुंडे नवे कृषिमंत्री, मुख्यमंत्री नाराज

सतत शेतकऱ्यांच्या विरोधात विधाने केल्याने वादग्रस्त ठरलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आता विधान परिषदेत ऑनलाइन …

नागपूर मेट्रो स्टेशनला आग : प्रवासी..!

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *