Breaking News

ओबीसी घरकुलाची मर्यादा वाढवून देण्यात यावी खासदार भावनाताई गवळी यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी

Advertisements
  • ओबीसी घरकुलाची मर्यादा वाढवून देण्यात यावी खासदार भावनाताई गवळी यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी

वाशिम(दि.4सप्टेंबर):- संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओबीसी कुटुंबातील गरजू कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून घरकुलांच्या प्रतीक्षेत आहे. ओबीसी कुटुंबातील भूमिहीन शेतमजूर गरजू कुटुंबांना घरकुल नसल्यामुळे प्रत्येक गावात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तर मोठ्या प्रमाणात कच्ची घरे शिकस्त झाली आहे.

Advertisements

ओबीसी कुटुंबातील घरकुलांच्या अपेक्षित असून केंद्र व राज्य शासनाने ओबीसी घरकुलांची मर्यादा वाढवून घरकुला करिता अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी केंद्र व राज्य शासनाने केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अगदी कमी प्रमाणात ओबीसी व अल्पसंख्यांकांना घरकुला बाबत योग्य अंमलबजावणी झाली नाही. मोठ्या प्रमाणात ओबीसी व अल्पसंख्यांक कुटुंब टिनच्या व पडक्या घरामध्ये उदरनिर्वाह करत आहेत. आजही ग्रामीण भागात घरामध्ये शेतकरी-शेतमजूर यांना घर बांधण्यासाठी पैशाची उपलब्धता नसल्याने पडक्या घरामध्ये वास्तविक करावे लागत आहे अशी दयनीय अवस्था घरकुलाची झाली आहे. ग्रामीण भागामध्ये दोन-तीन वर्षांत किंवा पाच घरकुले मिळतात. लोकसंख्येचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात ओबीसी व अल्पसंख्याक गरजू कुटुंबांना घरकुलाची गरज आहे.राज्य सरकारने ओबीसी व अल्पसंख्यांक घरकुलांच्या कोट्यात वाढ करून घरकुलाची मर्यादा वाढवून द्यावी. सततची नापिकी व कर्जबाजारी मुळे अत्यल्प शेतकरी असल्याने या कुटुंबाची घरे बांधण्यात येत नसल्यामुळे अशा गरजू शेतकरी कुटुंबांना प्राधान्य देण्यात यावे. रमाई आवास योजने मधून अनेकांना घरकुल मिळाले, पैशांची जुळवाजुळवी करून बांधकाम सुद्धा केले. मात्र कुटुंबांना घरकुलांचा हप्ता मिळणे कठीण झालं आहे. यासाठी केंद्र शासनाने योग्य अंमलबजावणी करावी अशी मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी केली.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

पदभरती रखडली : आचारसंहितेनंतर नियुक्ती मिळणार?

राज्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. शासनाकडून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु आचारसंहितेमुळे नियुक्ती …

भ्रष्टाचार : जिल्हा परिषदेत एकाच कामाची दोन बिलं मंजूर

जिल्हा परिषदेतील आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालक्यातील काही कामांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *