Breaking News

IPL 2020 : अशी आहे मुंबईची फलटण, पाहा कोणकोण आहे संघात

१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा ‘रनसंग्राम’ होणार

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. करोनाचा धोका लक्षात घेता यंदाच्या IPLहंगामाचे आयोजन भारताबाहेर UAEमध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा ‘रनसंग्राम’ होणार आहे. मुंबई संघानं आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ असे चार वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना होण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मुंबईचा संघ जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या चमूत ७ फलंदाज, ९ गोलंदाज, ३ विकेट किपर आणि पाच अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. पाहूयात मुंबईच्या संघातील शिलेदार

फलंदाज – रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे (विकेटकिपर), अनमोलप्रीत सिंग, ख्रीस लीन, इशान किशन (विकेटकिपर), मोहसीन खान, क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), सौरभ तिवारी, सुर्यकुमार यादव, शेर्फन रुदरफोर्ड

गोलंदाज – जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, जेम्स पैटिनसन, दिगविजय देशमुख, जयंत यादव, मिचेल मॅक्लेनघन, नॅथन कुल्टर नाइल, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट

अष्टपैलू – हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, क्रृणाल पांड्या, अनुकुल रॉय, प्रिन्स बलंवत राय

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …

१२ भाविकांचा मृत्यू : मौनी अमावस्येला महाकुंभात चेंगराचेंगरी : शाही स्नान रद्द

महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *