नागपूर(७ सप्टेंबर): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर आलेल्या धमकीच्या फोनने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानीही धमकीचा फोन आल्याने नागपूर पोलिसांची झोप उडाली आहे. या धमकीच्या फोननंतर गृहमंत्र्यांच्या सिव्हिल लाइन्समधील जीपीओ चौकातील निवासस्थानावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवास्थानावरील फोन खणखणला. ठार मारण्याची धमकी देत फोन करणाऱ्या फोन बंद केला. या वाक्याने निवासस्थानावरील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी लगेच गृहमंत्र्यांना माहिती दिली. त्यानंतर धमकीच्या संपूर्ण तपशीलासह पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर निवासस्थानावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली.

गृहमंत्र्यांनाही धमकीचा फोन
Advertisements
Advertisements
Advertisements