Breaking News

आमदार दादाराव केचे यांचे मंडप डेकोरेटर, साऊंड व बिछायतदारांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisements

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांच्याकडे आर्वी मंडप डेकोरेटर, साऊंड व बिछायत असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी कोरोना महामारीमुळे सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना शासनाने स्थगिती दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून टेन्ट, मंडप, कॅटरिंग, बँक्वेट हॉल, डी. जे. साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक इत्यादी सेवा देणारे लाखो लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीत आल्याने मानसिक तणावाखाली असल्याबाबतचे गाऱ्हाणे मांडले. वस्तुस्थितीचे गाभिर्य लक्षात घेऊन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे मागण्यांसंदर्भात निवेदन देऊन याबाबत मार्ग काढण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागणी बाबत अवगत करावे तथा जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात असेलेल्या बाबींवर शक्य तेवढी मदत करण्यासाठी असोसिएशनची भुमिका आमदार दादाराव केचे यांनी मांडली.

Advertisements

सरकारच्या आदेशानुसार ५० लोकांच्या उपस्थितीत हॉटेल, बँक्वेट हॉल, मंडप, फार्म हाऊस, टेन्ट यातील लग्न समारंभ करण्याची परवानगी दिली आहे. कार्यक्रमाला लोकांच्या कमी संख्येच्या परवानगी मुळे आयोजक दिलेल्या परवानगीला असहमत आहे. एवढ्या कमी संख्येत कार्यक्रम केले तर खर्चही निघत नसून तसेच लोक कार्यक्रम पुढे ढकलत असून काहींनी इच्छा असूनही मोठे कार्यक्रम न करता घरगुती कार्यक्रम करीत आहेत. कार्यक्रम होत नसल्याने संबंधित व्यवसायधारक व त्यांच्यावर अवलंबून असलेले लाखो परीवार आर्थिक चिंतेने ग्रासले आहे.

Advertisements

काही दिवसातच नवरात्री उत्सव असल्याने साऊंड व घरगुती छोटे मोठे कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी आमदार दादाराव केचे यांनी जिल्हाधिकारी यांना करत ५०० व्यक्तींच्या कार्यक्रम सोशल डिस्टंसिंगचे पालन करत करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. तसेच याबाबत शासनदरबारी मागणी लावून धरून आर्थिक अडचणींचा विचार करून असोसिएशनच्या रास्त मागण्या संदर्भात संबंधित मंत्र्यांना अवगत करणार असल्याचे सांगितले.

या प्रसंगी रमेश डवरे, सुनिल मानकर, वैभव जळीत, संजय माथुलकर, अभिजित डवरे, संजय अतकरी, विशाल बोके, नरेश राय, धनराज राहागडाते, बाबाराव पराळे, अशोक भगत, अनिल डवरे, सयद जुबेर, ज्ञानेश्वर काटणकर, नरेंद्र चव्हाण, आकाश वाघमारे, राहुल रनदीवे, बबलू डेहनकर, अब्दुल जुनेद, शुभम गुप्ता, रोशन बनशेड, निरज राणे, प्रदीप रवाळे, रोशन काळे यांची उपस्थिती होती.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

(भाग:175)ध्यान योग के द्धारा हम कठिन से कठिन अप्राप्त वस्तुओं को भी प्राप्त कर सकते है

भाग:175)ध्यान योग के द्धारा हम कठिन से कठिन अप्राप्त वस्तुओं को भी प्राप्त कर सकते …

नागपुरात देशात रेकॉर्ड निर्माण करणारा रोजगार मेळावा

नागपूर : नमो महारोजगार मेळाव्यामध्ये दाखल झालेल्या एकूण मुलाखत दिलेल्या तरुणांपैकी ११ हजार ०९७ तरुणांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *