Breaking News

ग्रामपंचायत सचिवालय कृषी विकास व ग्रामविकासाचे व्यासपीठ म्हणून उदयास यावे – खासदार रामदास तडस

Advertisements

वर्धा: केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा निधी ग्रामपंचायतींना दिला जातो. वित्त आयोगाद्वारे ग्रामपंचायतीस लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारावर मोठा निधी प्राप्त होत आहे.. या सर्वांचा विचार केल्यास सर्वसमावेशक ग्रामपंचायत विकास आराखडे तयार केले तर मिळणार्या निधीतून गावांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याकरिता ग्रामपंचायत पुढाकार घ्यावा तसेच ग्रामपंचायत सचिवालय कृषी विकास व ग्रामविकासाचे व्यासपीठ म्हणून उद्यास यावे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले.

Advertisements

                ते सेलू काटे ता. जि. वर्धा येथे ग्रामपंचायत भवनाचे नुतनीकरण व सौंद्र्यीकरणाचा लोकार्पन सोहळा प्रसंगी बोलत होते.  शुक्रवार दिनांक 16 ला सेलू (काटे) ता. जि. वर्धा येथे ग्रामपंचायत भवनाचे नुतनीकरण व सौंद्र्यीकरणाचा लोकार्पन सोहळा प्रसंगी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी प.स.सभापती महेश आगे, माजी सभापती व भाजपा महामंत्री मिलींद भेंडे, गटविकास अधिकारी संजय पाटील, सरपंच विजय तळवेकर, उपसरंपच सुजाता विजय निकोडे, प्रमोद वरभे, बलराज लोहवे, विजय निकोडे, वाल्मीक घोटे, पोलीस पाटील सचिन वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष मोहनराव पिस्सुडे, भानुदास भोयर, पांडूरंग निवल, पांडुरंग भोयर उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती वर्धा अंतर्गत ग्रामपंचायत सेलू काटे यांच्या वतीने सन 2019-20 या आर्थीक वर्षातील ग्रामपंचायत 5 टकके राखीव उत्पनातुन दिव्यांग व्यक्तीला लाभाथ्र्यांना राखीव निधीचे वाटप करण्यात आले.

Advertisements

                खासदार तडस पुढे म्हणाले की, . शेती हा ग्रामीण विकासाचा पाया आहे, केन्द्रसरकारने शेतक-यांना हित लक्षात घेऊन कृषी विधेयक ऐतिहासिक स्वरुपाची असुन शेतक-यांच्या आयुष्यात क्रांती व सकारात्मक बदल करणारी आहे. कायदा केल्याशिवाय कोणत्याही बाबतीत बदल घडवता येत नाही. जुन्या राज्यकत्र्यांनी शेतक-यांच्या हितार्थ फक्त भाषणबाजी केली परंतु मोदी सरकारने शेतक-यांकरिता कायदयाच्या माध्यमातुन एक भक्कम पाठबळ शेतक-यांच्या पाठीशी उभे केले आहे. केन्द्रसरकारने संसदेत पारित झालेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकरी ख-या अर्थाने स्वतंत्र व सशक्त होणार आहे. हा कायदा आजच्या काळाची गरज आहे. एक नवीन क्रांती या शेती क्षेत्रात येणार आहे. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने हा कायदा एक महत्त्वाचं पाऊल आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात हे सरकार देशातील शेतकर-यांच्या हितासाठी काम करण्यास वचनबद्ध असल्याचे यावेळी केले.

               यावेळी माजी सभापती व भाजपा महामंत्री मिलींद भेंडे, गटविकास अधिकारी संजय पाटील यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक सरंपच विजय तळवेकर यांनी केले, संचालन महेश आगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गामविकास अधिकारी एल.के. गुडवार यांनी मानले, कार्यøमाला ग्रा.पं.सदस्य रुपेश वैद्य, योगीता भोयर, राजेश डंभारे, अर्चना मांदाडे, सुभाष पांठारकर, विष्णुजी आ़त्राम, छायाताई धोटे, कृष्णकला जिलठे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

सड़क व भवन निर्माता कंपनियों ने बिना परमिशन के हीं खुदाई करवा दी नागपूर के सुरादेवी की पहाडी? सरकार को करोडों की चपत

सड़क व भवन निर्माता कंपनियों ने बिना परमिशन के हीं खुदाई करवा दी नागपूर के …

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?◾️   ◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *