Breaking News

वर्धेतील चौकांमध्ये सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. या नोड्सची देखभाल, दुरुस्ती व सुरक्षा विषयक जबाबदारी जिल्हयातील उद्योजक व विविध सेवा संस्थांनी स्विकारली

Advertisements

वर्धा, दि. 16 ऑक्टोंबर:  सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत  वर्धा शहर, सेवाग्राम , पवनार, व वरुड येथील  चौकांमध्ये सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. या नोड्सची  देखभाल, दुरुस्ती व  सुरक्षा  विषयक  जबाबदारी  जिल्हयातील  उद्योजक व विविध  सेवा संस्थांनी स्विकारली आहे.

Advertisements

            सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत बांधण्यात आलेल्या नोड्सच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी देण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली  नगर पालिका, उद्योजक व संस्थाच्या प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्यात आली.  यावेळी बैठकिला   जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेभुर्णे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके,  मुख्याधिकारी विपीन पालीवाल,  उद्योजक व संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisements

            बैठकिमध्ये  उद्योजक व विविध संस्थाच्या प्रतिनिधी सोबत चर्चा केल्यानंतर    नोड्सची सुरक्षा, दुरस्ती व देखभाल करण्याची  जबाबदारी संस्थानी स्विकारली.  महात्मा गांधी चौकातील विकास भवन – अध्यक्ष उत्तम गाल्वा स्टिल कॉम्प्लेक्सच्या वतीने पु.सी. पांडे,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व  सार्वजनिक बांधकाम विभाग चौक,कस्तुरबा चौक, सेवाग्राम, वर्धा नागपूर  हायववरील शिल्पकला दत्तपूर (पवनार) याची जबाबदारी  –  व्यवस्थापक,  महालक्ष्मी  टिएमटी प्रायव्हेट  लिमिटेड देवळीच्या वतीने श्याम मुंदडा,  राणी झाशी चौक, शिवाजी चौक –  संचालक, फिबजी च्या वतीने अजय मुनोत,  बजाजवाडी चौक, गिताई मंदिर, गोपूरी  नालवाडी व्हीआयपी चौक, गांधी चौक ते बजाजवाडी ते झाशी राणी चौक  – सभापती  शिक्षा मंडळ,  कस्तुरबा चौक सेवाग्राम सर्व सेवासंघ भाग – कार्यकारी  अध्यक्ष सर्व सेवा संघ सेवाग्रामच्या वतीने चंदन पाल   व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सेवाग्राम (जुने) भागाचे सुशोभिकरण – सेवाग्राम ग्रामपंचायत  यांचा समावेश आहे.

            सदर नोड्सची देखभाल  करणे, निगा राखणे,  सुरक्षित ठेवण्यासाठी   संबंधित संस्थाना पुढील तीन वर्षासाठी हस्तातरीत करण्यात येत आहे.  यासाठी येणारा खर्च  संबधितांना करावा. असे बैठकित ठरविण्यात आले.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *