वर्धा, दि. 16 ऑक्टोंबर: शासकिय दुध योजने अंतर्गत विक्री करण्यात येत असलेल्या पाश्चराईड व होमोनाईज्ड गाय दुध व टोन्ड (आरे) दुध विक्रीच्या दरात आज 16 ऑक्टोबर पासुन 2 रुपये प्रति लिटर दराने वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी असलेल्या 36 रुपये प्रति लिटर वरुन आता 38 रुपये प्रति लिटर दुधाचे दर आकारण्यात येणार आहे. अर्ध्या लिटरसाठी ( 500 मि.ली. ) 18 रुपयावरुन 19 रुपये आकारण्यात येणार आहे. दुग्ध शाळेत उपलब्ध असलेल्या जुन्या दराच्या पॉलीथीन फिल्मचा साठा सुपुष्ठात येई पर्यंत व वाढीव दराची पॉलीथीन उपलब्ध होई पर्यंत जुन्या दराच्या पॉलीथीनमध्ये नविन दराने दुध विक्री करण्यात आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शासकिय दुग्ध योजनेचे दुग्धशाळा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
