Breaking News

सात दिवसांत निर्णय घेऊन समस्या मार्गी काढा – आमदार दादाराव केचे

आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील अतिक्रमित जागा तातडीने नियमित करा – आमदार दादाराव केचे
*पुनर्वसित गावांकरीता १८ नागरी सुविधा करीता मिळालेल्या निधीतून झालेल्या कामांचे अॉडीट करा – आमदार दादाराव केचे
*आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली अतिक्रमणधारक व पुनर्वसनची बैठक संपन्न
वर्धा येथील जिल्हा परिषद सभागृहात आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील वर्षानुवर्षे अतिक्रमण करून राहत असलेल्यांना पट्टे मिळावे तसेच निम्म वर्धा प्रकल्पा अंतर्गत बाधीत गावे पुनर्वसन झाल्यावर १८ नागरी सुविधांची देखभाल दुरुस्ती करीता मिळालेल्या ३५ कोटी रूपयांची विविध एजन्सी मार्फत कामे केले गेली या बाबतीत आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भीमनवार यांच्या उपस्थितीत यशस्वी बैठक संपन्न झाली.
आर्वी शहरातील दत्त वार्ड, रामदेव वार्ड येथील ४० वर्षापासून वास्तव्यास असलेले १९७, कारंजा शहरातील इंदिरा नगर, खर्डी वार्ड, आष्टी नगर पंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक ६,७,८, सावध हेटी, वागदा पुनर्वसन, ब्राह्मणवाडा, शिरपूर बोके, तारासावंगा, दुर्गवाडा, नवीन आष्टी, कवाडी गव्हान खेडी, सावंगी पोळ, बाभुळगाव येथे वास्तव्यास असलेल्यांना आजवरही भुखंडाचे पट्टे मिळाले नाही. तसेच सुसुंन्द्रा येथील शेतीच्या ७/१२ मध्ये मोजनी चुकीची झाल्यामुळे अडचणी आहेत. यात दुरूस्ती करून १६ भोगवटदारांना ७/१२ नकाशा दुरूस्ती करून सुधारीत ७/१२ देण्यासाठी आमदार दादाराव केचे यांनी तातडीने कारवाई करण्याचे सांगितले. प्रत्येकांचे म्हणने ऐकून जिल्हाधिकारी वर्धा यांना आमदार दादाराव केचे यांनी वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना पट्टे न मिळाल्याने पंतप्रधान आवास योजनेचा लाभ नावे येऊनही मिळाला नाही. याबाबत वन विभाग, झुडपी जंगल, महसूल विभागाची जागा यावर असलेले अतिक्रमण शक्य तोवर नियमित करावे अथवा दुसऱ्या कडे जागा देऊन स्थलांतरित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी आर्वी,तथा आर्वी, आष्टी व कारंजा येथील गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी सांगितले. तसेच आमदार दादाराव केचे यांनी संबंधीताना नियमानुसार पट्टे देण्यासाठी निर्देशित केले. तसेच किन्हाळा येथील प्रलंबित पाईपलाईन वन विभागाच्या जागेवरून जात असल्याने वन विभाग व गटविकास अधिकारी यांनी समन्वयाने तोडगा काढून पाईपलाईनचे काम पुर्णत्वास नेण्यात यावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
निम्म वर्धा प्रकल्पा अंतर्गत पुनर्वसित गावांच्या १८ नागरी सुविधांची देखभाल दुरुस्ती करीता ३५ कोटी रुपयांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, महावितरण यांच्या मार्फत करण्यात आली. या निधीतून खर्च झालेला निधी किती व अखर्चित निधी किती याबाबत अॉडीट करून माहीती घेऊन अखर्चित निधीतून गावांकरीता आवश्यक असलेली कामे करावी. तसेच पुनर्वसन गावातील नागरिकांना देण्यात आलेल्या ७/१२ मध्ये त्रुटी असल्याने प्राप्त अर्जाप्रमाणे दुरूस्ती करावी. नगर रचनाकाराचा अभिप्राय न घेता तथा अभिन्यासास नगररचनाकाराची मंजुरी नसतांना पुनर्वसन वसाहती स्थापित करण्यात आल्या. परीणामी प्रकल्प ग्रस्त कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यास पात्र ठरत नाही.
आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी आष्टी व कारंजा तालुक्यातील शासकीय जागा, वन विभागाच्या जागेवर राहत असलेली कुटुंबांना हक्काचे पट्टे नसल्याने शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. करीता वर्षानुवर्षे राहत असलेल्या कुटुंबांना पट्टे वाटपा संदर्भात असणाऱ्या त्रुटी दुरूस्ती करून संबंधितांना पट्टे वाटपा संदर्भात सात दिवसांत निर्णायक निर्णय घेण्या बाबत आमदार दादाराव केचे यांनी निर्देशित केले.
या बैठकीला जि. प. अध्यक्षा सरिता गाखरे, जिल्हाधिकारी भीमनवार, ओबासे मुख्य कार्यपालन अधिकारी जि. प. वर्धा, सुनिल कोरडे उपजिल्हाधिकारी, मोरे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) विभाग वर्धा, येरोडे कारंजा नगर पंचायत, मोहड कार्यकारी अभियंता महावितरण, वऱ्हाडे कार्यकारी अधिकारी निम्म वर्धा प्रकल्प वर्धा, मदनकर कार्यकारी अभियंता मजीप्रा वर्धा, शर्मा मुख्य वनसंरक्षक वर्धा, गुरूमुखी उपअभियंता मजीप्रा, बारब्दे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी, हरीष धार्मिक उपविभागीय अधिकारी आर्वी, चव्हाण तहसीलदार आर्वी, वानखेडे तहसीलदार आष्टी, कुमावत तहसीलदार कारंजा, जमदाडे गटविकास अधिकारी पं. स. आर्वी, बारापात्रे गटविकास अधिकारी पं. स. आष्टी, देशमुख गटविकास अधिकारी पं. स. कारंजा, वाघ ग्रामीण पाणीपुरवठा जि. प. वर्धा, काळपांडे उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, साकेत राऊत अभियंता न. प. आर्वी, कोहळे अधिक्षक भुमि अभिलेख वर्धा यांच्या सह तक्रार असलेले नागरिक व प्रकल्प ग्रस्तांची उपस्थित होती.

About Vishwbharat

Check Also

हाईकोर्ट की शर्त मंजूर के साथ मुस्लिम पुलिस कर्मियों को दाढ़ी रखने की अनुमति

हाईकोर्ट की शर्त मंजूर के साथ मुस्लिम पुलिस कर्मियों को दाढ़ी रखने की अनुमति टेकचंद्र …

मौदा तालुक्यातील झुल्लर येथे कंपनीत ब्लास्ट : 1 ठार, 9 जखमी

नागपूर : मौदा तालुक्यातील झुल्लर गावातील एका खासगी कंपनीत आज सकाळी ब्लास्ट झाला. यात एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *