Breaking News

भारतीय कामगार संघटनेचे जनक “नारायण मेघाजी लोखंडे”

Advertisements

महात्मा फुलेंयांच्या विचारांवर “रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे” यांनी १८९० साली भारतामध्ये “बॉम्बे हॅण्ड्स मिल असोसिएशन” नावाची पहिली संघटना स्थापन केली. ते शिरूर पुणे येथील होते तसेच ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्तेही होते.

Advertisements

भारत जेंव्हा ब्रिटिश भारत होता तेंव्हा असंघटित कष्टकरी गिरणी कामगारांना कामाचे तास नव्हते, आठवडयाची साप्ताहिक सुट्टी नव्हती.गिरणीत काम करताना गंभीर दुखापत झाली तर दवाखाण्याचा खर्च मिळत नव्हता. कामावर नाही तर पगार नाही. काम करून महिना झाला तरी कोणत्या तारखेला पगार मिळेल याची हमी नाही. या सर्व समस्यांवर असंघटित कष्टकरी गिरीणी कामगाराचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांना संघटीत करून गिरणी मालक संघा विरोधी संघर्ष सुरू केला. कामगारांच्या संघर्षला मालक दाद देत नव्हते. तेव्हा त्यांनी ५५०० गिरणी कामगारांच्या सहया घेऊन फँकटरी कमीशनचे अध्यक्ष डब्ल्यु.बी. मुलक यांच्याकडे १५ ऑक्टोबर १८८४ रोजी पिटीशन दाखल केले, त्याचे फळ सहा सात वर्षाच्या संघर्षानंतर १० जून १८९० ला मिळाले त्यावेळी गिरणी मालक संघाने जाहीर सभा घेऊन त्यात नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुचविलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून मागण्या मान्य केल्या, त्यातिल सर्वात महत्वाची मागणी “रविवारची साप्ताहिक सुट्टी” होय.

Advertisements

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार मंत्री असताना कामगार कायदयात तशी कायमची तरतुद केल्या मुळेच भारतातील तमाम सरकारी कर्मचारी व अधिकारी रविवारच्या सुट्टीचे मुक्त-भोगी आहेत.

आजच्या अनेक सुशिक्षित व उच्च शिक्षित नोकरी करणार्‍यां कर्मचारी आणि अधिकार्यांना याची माहिती नसेल? त्यांनाच काय त्यांच्या कामगार संघटना, युनियन चालविणाऱ्या नेत्यांना सुध्दा रविवारची सुटटीचे जनक हे असंघटित कष्टकरी गिरणी कामगारांना संघटीत करणारे सत्यशोधक चळवळीचे (OBC) कुशल संघटक नारायण मेघाजी लोखंडे होते आणि रविवारच्या सुट्टी चे कायद्यात रुपांतर करनारे (SC) घटनेचे एकमेव शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर होते हे आज किती कर्मचारी आणि अधिकार्यांना माहिती आहे?

आज देशातील संघटित आणि असंघटित कर्मचारी अधिकार्यांच्या संघटनांना भांडवलदार जुमानत नाही नेतृत्वाची दखल घेत नाहीत, कारण कामगारांच्या संघटनचे नेतृत्व शोषित-पडिता कडे नसून शोशकांच्या अर्थात उच्चवर्णिच्या हातात आहे.कामगार ज्याच्या कडे न्यायाची अपेक्षा करातो तो शाशक भांडवलशाहीचा समर्थक आहे आणि जो कामगारांना न्याय मिळवून देन्या साठी संघटना निर्माण करतो तो सामाजिक सररचनेत शोशक व ब्राह्मणशाही समर्थक आहे.
भांडवलशाही व ब्राह्मणशाही शोषित पिडित बहुजनांना न्याय मिळवून देतील का?

आजच्या वर्तमानातला कर्मचारी व अधिकारी आंदोलनाचा हाच खरा प्रश्न आहे?

“नारायण मेघाजी लोखंडे” या थोर कामगार नेत्याच्या महान कार्यास कोटी कोटी प्रणाम !!!

Advertisements

About Vishwbharat

Check Also

सड़क व भवन निर्माता कंपनियों ने बिना परमिशन के हीं खुदाई करवा दी नागपूर के सुरादेवी की पहाडी? सरकार को करोडों की चपत

सड़क व भवन निर्माता कंपनियों ने बिना परमिशन के हीं खुदाई करवा दी नागपूर के …

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?◾️   ◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *