Breaking News

महिलादिनी सेवाभावी, कर्तव्यदक्ष भगीनींचा हंसराज अहीर यांचे शुभहस्ते सन्मान

चंद्रपूर- मातृशक्तीला रणरागीनीची उपमा दिली जाते. देशात कोरोना संकटकाळात स्वतःच्या जीवावर उदार होवून आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा बाळगुन कोरोनाग्रस्तांची विचलीत न होता अविरत सेवा करून कोरोना रूग्णाना नवजीवन बहाल केले व काहींनी रात्रंदिवस जागता पहारा देवून कोरोनाचा फैलाव होण्यास अटकाव करून सुव्यवस्था स्थिती अबाधित ठेवण्याचे कर्तुत्व गाजवले. शहरातील सफाईच्या कामी ज्यांचे हात कारणीभुत ठरले अशा सर्व भगिनींच्या प्रती सद्भावना व्यक्त करणे हे सामाजिक कर्तव्य समजुन जागतिक महिला दिनी अशा रनरागीनींचा सत्कार करण्याचे सौभाग्य मिळणे हे अभिमानास्पद असल्याची भावना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व्यक्त केली.

जागतिक महिला दिनी दि. 08 मार्च रोजी भाजपा जनसंपर्क कार्यालयात सायं. 07.00 वा हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते महिला डाॅक्टर्स, परिचारीका, पोलीस, सफाई कामगार भगिनींचा पुष्पगुच्छ व भेटवस्तु देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास भाजपा नेते विजय राऊत, महापौर राखीताई कंचर्लावार, चंद्रपूर महानगर महिला आघाडी अध्यक्ष अंजलीताई घोटेकर, मनपा महिला व बालकल्याण सभापती चंद्रकलाताई सोयाम, झोन सभापती संगिता खांडेकर, प्रा. ज्योतीताई भुते, निलम चैधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना हंसराज अहीर यांनी प्रधानमंत्री मोदींच्या राजवटीमध्ये महिलांच्या सन्मान, संरक्षण व उत्थानासाठी कायदा अमलात आणुन भरीव कार्य पार पडले असे सांगुन बेटी बचाव-बेटी पढाव ही संकल्पना महिलांच्या पथ्यावर पडली असुन पालकांचा मुलींबद्दल असलेला दृष्टीकोन शतपटीने बदलला असल्याचे सांगीतले. या प्रसंगी डाॅ. गर्गेलवार, डाॅ. अश्विनी भारत यांनी महिला दिवसाचे महिलांप्रतीचे महत्व आपल्या भाषणातून विषद केले. कार्यक्रमास बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन अंजली घोटेकर यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. ज्योती भुते यांनी मानले.

About Vishwbharat

Check Also

वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार : परिसरात दहशत

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल)च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार झाल्या. मेंढा (माल) …

नागपुरातील कॉटन मार्केटमध्ये रेल्वे पुलाखालून वाहतूक बंद

नागपुरातील लोहा पुलाचे बांधकामामुळे कॉटन मार्केट चौकाकडून सीताबर्डीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे कॉटन मार्केट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *