Breaking News

जबलपूर ते चांदा फोर्ट जलद गती रेल्वेला हिरवी झेंडी

Advertisements

जबलपूर ते चांदा फोर्ट जलद गती रेल्वेला हिरवी झेंडी
चंद्रपूर-
जबलपूर ते चांदा फोर्ट या नवीन जलद गती रेल्वेला आरंभ झाला असून, मंगळवारी चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी या रेल्वेचे स्वागत केले व हिरवी झेंडी दाखवून प्रवासासाठी रवाना केले.
चंद्रपूर महानगर व जिल्ह्यातील व्यवसायी, उद्योजक तसेच नागरिकांना थेट जबलपूर, बालाघाट शहराकरिता रेल्वे प्रवास सोयीचा व सुकर व्हावा यासाठी चांदा फोर्ट ते जबलपूर नवीन जलद गती रेल्वे गाडी सुरू करण्यासाठी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर तसेच रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. या मागणीची दखल घेत चांदा फोर्ट-जबलपूर जलद गती रेल्वे क्रमांक 02273 सुरू करण्यात आली. 9 मार्चला दूपारी 1.45 वाजता ही रेल्वे चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर पोहोचताच चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी तसेच विविध संस्था, संघटनांशी निगडीत नागरिकांनी या रेल्वेचे स्वागत करून पायलटचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यापूर्वी चंद्रपूरहून जबलपूरला नागपूर, इटारसी मार्गे जावे लागत होते. त्यामुळे तब्बल 12 तास प्रवास करावा लागायचा. या नव्या गाडीमुळे केवळ 8.30 तासात जबलपूर येथे पोहचणे आता शक्य होणार आहे. ही गाडी मंगळवार, गुरूवार आणि शुक्रवार अशा तीन दिवस असेल. जबलपूरहून ही गाडी पहाटे 5:15 वाजता निघून दुपारी 1: 45 वाजता पोहचेल. तर चांदा फोर्टहून दुपारी 2:50 वाजता निघून रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी जबलपूरला पोहचेल. भविष्यात या गाडीचा थांबा मूल-मारोडा, नागभीड, वडसा, सौंदड स्थानकावर मिळण्याकरिता प्रयत्न केला जाणार आहे, असेही रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी हंसराज अहिर यांचेही समितीच्या पदाधिकार्‍यांनी विशेष आभार मानून गाडी सुरू केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी भाजपा नेते खुशाल बोंडे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, तुषार सोम, मंगेश गुलवाडे, संदीप आगलावे, नगरसेविका ज्योती गेडाम, नगरसेवक शाम कनकम, प्रदीप किरमे, विकास खटी, राजू घरोटे, प्रा. रवी जोगी, तुषार मोहूर्ले, रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे डॉ. भुपेश भलमे, रमेश बोथरा, नरेश लेखवानी, रमाकांत देवडा, प्रभाकर मंत्री, पुनम तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

 

https://www.tarunbharat.net//Encyc/2021/3/9/Green-flag-for-high-speed-train-from-Jabalpur-to-Chanda-Fort.html

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

रामनामाने नागपूर दुमदुमले, दीपोत्सव साजरा : अयोध्येत सकाळपासून भाविकांच्या रांगा

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्‍लाची काल सोमवार (२२ जानेवारी) रोजी प्राणप्रतिष्‍ठा करण्यात आली आहे. देशभरातील …

वनमंत्री मुनगंटीवार ने ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान के पास हवाई अड्डा बनाने का किया अनुरोध

वनमंत्री मुनगंटीवार ने ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान के पास हवाई अड्डा बनाने का किया अनुरोध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *