Breaking News

*कर्नल चौकात दारूची बाजारपेठ, डी.बी.तील कर्मचाऱ्यांचे अभय*

Advertisements

(आशिष यमनुरवार तालुका प्रतिनिधी)

Advertisements

*• गुन्हे अन्वेषण विभागातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त सहभाग*

Advertisements

राजुरा, दि. २० मार्च : शहरातील आसिफाबाद मार्गावरील कर्नल चौक आता दारूची बाजारपेठ म्हणून ओळखला जावू लागला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेतील काही कर्मचारी यात उत्स्फुर्त सहभागी होत आहे. जसा आठवडी बाजारपेठेला पोलीस बंदोबस्त पुरवावा तसा बंदोबस्त गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचाऱ्यांकडून कर्नल चौकातील दारू विक्रेत्यांना पुरविला जात आहे. यामुळे दारू विक्रेते मोठ्या सोयीने दारूची विक्री करतांना दिसून येत आहेत. या अवैध दारू विक्रीमुळे सुशिक्षीतांचा कर्नल चौक आता बदनाम होवू लागला आहे.

राजुरा पोलीस स्टेशन मधील गुन्हे अन्वेषण विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांने चर्चेत राहीला आहे. ही शाखा बरखास्त करण्याची मागणीसुध्दा राजुरामध्ये झाली. गुन्हे अन्वेषण शाखेतील एक चंद्रपूरहून ये-जा करणारा कर्मचारी हा अवैध व्यवसायीकांना सहाय्य करत आहे. हा कर्मचारी काळ्या रंगांची व विना नंबर प्लेटची दुचाकी घेवून नेहमी कारवाईच्या नावाखाली कर्नल चौकात आपली दादागीरी गाजवत दारू व्यवसायीकांना मदत करीत आहे. 03 मार्चला कर्नल चौकात तर गुन्हे शाखेतील दोन कर्मचारी कारवाईच्या नावाने उभे असतांना त्यातील एक पोलीस कर्मचारी, एक नगर परिषदेतील निवडणूक तथा सभा लिपीक यांनी एका दारू विक्रेत्यासोबत पाणीपुरीच्या ठेल्याजवळ जावून दारू पार्टी केल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून बोलले जात आहे. काहींनी हा प्रकार चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेल्या अंधारामुळे चित्रीकरण आले नाही. हा सर्व प्रकारामुळे त्या दोन्ही कर्मचाऱ्याबद्दल नागरिकांमधे असंतोष दिसून येत आहे.

पोलीसांकडूनच विना नंबरचे वाहन वापरून दारू विक्रेत्यांना अभय देण्याचे कार्य होत असल्याने जनतेत रोष उमटत आहे. कर्नल चौकांमध्ये शिकवणी वर्गाला जाणारे विद्यार्थी, सांयकाळी फिरायला निघणाऱ्या महिला, वयोवृध्द नागरिक यांची मोठी वर्दळ असते. या सुज्ञ नागरिकांना पोलीसांच्या सहकार्याने होत असलेल्या दारू विक्रीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष पुरवून गुन्हे शाखेतील त्या दोन्ही कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच कर्नल चौकातील दारू विक्रीवर प्रतिबंध घालण्याची मागणी जोर धरत आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. राजू पारवे हे …

सद्गुरु जग्गू वासुदेव यांच्या इशा फाऊंडेशनमधून ६ लोक बेपत्ता

आध्यात्मिक सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा तमिळनाडूमधील कोइम्बतूर याठिकाणी इशा फाऊंडेशन नावाची संस्था आहे. या ठिकाणाहून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *