Breaking News

मनपाने लसीकरणात ५८ हजारांचा टप्पा गाठला 

Advertisements
 १८ ते ४४ वयोगातील ३ हजारावर व्यक्तींचे लसीकरण

चंद्रपूर, ता. १० : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीना पहिली तर, फ्रंटलाईन वर्करसह ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना पहिली व दुसरी लस दिली जात आहे. एकूण ५८ हजार ५६० जणांनी लसीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतली. यात ४९ हजार ८८४ कोविशिल्ड, तर ८ हजार ६७६ जणांनी कोव्हॅक्सीन लस घेतली.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. प्रारंभी आरोग्य सेवेतील व्यक्तींना  लस देण्यात आली. त्यात ६ हजार २६७ आरोग्य सेवकांना पहिला डोस, तर ३ हजार ९६१ जणांना दुसरा डोस देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ४ हजार १२५ जणांना पहिला डोस व २ हजार १०० जणांना दुसरा डोस देण्यात आला. आरोग्य सेवक व फ्रंट लाईन वर्कर मिळून ९ हजार ११६ नोंदणीकृत लाभार्थ्यांना पहिला व दुसरा असे १६ हजार ४५३ डोस देण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक व ६० वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आतापर्यंत २३ हजार २२० ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस तर ५ हजार २९४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. तसेच ९ हजार ६०२ व्याधीग्रस्त नागरिकांना पहिला डोस, तर ९४५ जणांना दुसरा डोस देण्यात आला.

Advertisements
शासन निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २ मेपासून १८ ते ४४ वयोगातील व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी ३ केंद्र निर्धारित करण्यात आले होते. यात २ हजार ४८७ जणांना कोविशिल्ड तर, ५५९ जणांना कोव्हॅक्सीन लस देण्यात आली. चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत आतापर्यंत एकूण ५८ हजार ५६० जणांनी लसीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतली. यात ४९ हजार ८८४ कोविशिल्ड, तर ८ हजार ६७६ जणांनी कोव्हॅक्सीन लस घेतली. आता ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी आणखी २ नवीन केंद्र राखीव ठेवण्यात येणार असून, एकूण पाच केंद्राच्या माध्यमातून लसीकरण केले जाणार आहे. आता ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी आणखी २ नवीन केंद्र राखीव ठेवण्यात येणार असून, एकूण पाच केंद्राच्या माध्यमातून लसीकरण केले जाणार आहे.
ऑनलाईन रजिस्ट्रेशन ‘कोविन’ वरूनच करा
१८ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु झाल्यानंतर लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊन गोंधळ वाढण्याची शक्यता असल्याने या वयोगटाला नोंदणी आवश्यक आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ‘कोविन’ या अधिकृत वेबसाईटवरूनच करावी. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे, त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, हे लसीकरण झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला ३० मिनिटे केंद्रावरच थांबायचे आहे. यावेळी आपल्या मोबाईलवरून लसीकरण केल्याचे ई- प्रमाणपत्र स्वतःच डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहनही महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *