Breaking News

रेशनकार्ड धारक नसलेल्या कुटुंबांना रेशन द्या-खासदार बाळू धानोरकर यांची अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी

Advertisements
चंद्रपूर : कोरोना काळात मागील एका वर्षांपासून अनेकदा लॉकडाऊन लावण्यात आले. यावेळी समाजाच्या शेवटच्या वर्गातील लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामध्ये जे बाहेर राज्यातील लोक आहेत. त्यांच्या नावाने रेशन कार्ड नाही. त्यांना राशन मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारक नसलेल्या कुटुंबाना रेशन द्या अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. 
मार्च  २०२० पासून देशभरात कोरोना लोकडाऊन मुळे तळागळापर्यंत जनता होळपळुन निघाली आहे. अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहे. राज्य शासनाने गरीब कुटुंबासाठी जे रेशन कार्ड धारक आहेत. त्याचे साठी प्रतिमाह प्रतिव्यक्ती अन्नधान्य सुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय अन्न योजने अंतर्गत मे व जून  २०२१ करीत अंतोदय अन्न वाटप होत आहे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत देखील या प्रमाणेच वाटप होत आहे. मात्र मजूर वर्गामध्ये अनेकांकडे रेशन कार्ड नाहीत. अनेक परप्रांतीय मजूर कुटुंब देखील राज्यात ठिकठिकाणी वास्तव्यास आहेत. त्याचा देखील रोजगार बंद असून त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची सोया होणे गरजेचे आहे. या शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबियांसाठी कोटा वाढवून गरजू कुटुंबांना लाभ देता येईल. व त्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी रेशनकार्ड धारक नसलेल्या कुटुंबांना रेशन द्या अशी लोकहितकारी मागणी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. 
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *