वाघाचा हल्ल्यात एक ठार

मूल: वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी घडली. मूल तालुक्यातील मारोडा येथील आदर्श खेड्यात राहणारा मनोहर आडकुजी प्रधाने (६८) हा रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या मुलगा आणि सुनेला जेवनाचा डब्बा देवुन नहरा लगतच्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडुन घराकडे परत येत असतांना नहरात विश्रांती घेत असलेल्या किंवा पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना घडली. सकाळी गेलेला मनोहर दुपारी १२ वा. पर्यत घरी परत न आल्याने त्याचा शोध घेतला असता मनोहर प्रधाने नहराच्या काठावर मृतावस्थेत दिसला. मृतक मनोहरचा पाय तोडलेला आणि गळा चिरलेला दिसल्याने वाघानेच त्याला ठार केल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहीती होताच वनपरीक्षेञ अधिकारी जी.आर.नायगमकर, क्षेत्र सहाय्यक पाकेवार, वनरक्षक उईके, पारधे आणि ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतक मनोहर प्रधाने यांच्या कुटूंबियास वनविभागाने २५ हजार रूपयाची तातडीची मदत दिली.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *