Breaking News

आरक्षणाचे राजकीय जनआंदोलने आणि अडथळे ?.

आरक्षणाचे राजकीय जनआंदोलने आणि अडथळे ?.
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्ध करून टाकले.त्यामुळे सर्वच युती आघाडी महाआघाडी सरकार मधील पक्ष अडचणीत आले.त्यातून बाहेर पडण्यासाठी अजित दादांनी मागासवर्गीय समाजातील कामगार,कर्मचारी अधिकारी यांच्या आरक्षणातून पदोन्नतीला ७/५/२०२१ च्या आदेशाने सुरुंग लावून दोन समाजातील असंतोष शांत करण्या ऐवजी उघडपणे आग लावली.आरक्षणातुन पदोन्नतीसाठी मराठा आणि मागासवर्गीय आपसात भिडतील अशी अपेक्षा केली जात आहे.मराठा समाज जसा गरीब,श्रीमंत यात विभागला आहे तसाच मागासवर्गीय ओबीसी,आदिवासी अल्पसंख्याक समाज गर्वसे कहो हम हिंदू है म्हणणाऱ्या संस्था,संघटनेत विभागला आहे.तो आरक्षणाचा समर्थक आहे कि विरोधक हे त्यालाच आता ठरवावे लागेल.तो काही निर्णयक भूमिका घेण्याच्या आदी आंबेडकरी विचारांच्या मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांनी जनांदोलन करण्याची भूमिका घेऊन एकत्र येवून आरक्षण हक्क कृती समिती स्थापना करून संघर्षास तयार झाली आहे.आरक्षण लाभार्थींनी कोणत्या राजकीय पक्षा कडून अपेक्षा करू नये.सर्वच संधीसाधू असतात व आहेत.हे लक्षात घ्यावे.
महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका 2014 ला झाल्या तेव्हा राजकीय जनआंदोलन करणारे विरोधक सत्ताधारी झाले.त्यामुळे पूर्वीचे सत्ताधारी पूर्णपणे अपंगत्व आल्यासारखे झाले. विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याची हिंमत त्यांच्यात राहीली नाही.तीच परिस्थिती 2019 च्या विधानसभा निवडणुकीत होईल अशी अपेक्षा ठेऊन काँग्रेस राष्ट्रवादीचे वतनदार,वजनदार मराठा घराणे भाजप शिवसेनेत गेले युतीने जिद्दीने विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली.माननीय नामदार देवेन्द्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल ही प्रतिज्ञा घेतली होती. ती पूर्ण होणार हे शंभर टक्के खात्री झाली होती. पण त्याला शिवसेना पक्षप्रमुख यांनी आदरणीय शरद पवार यांच्या आशीर्वादाने सुरुंग लावला. त्यात आता संपूर्ण महाराष्ट्र भरडल्या जात आहे. आरक्षणाचे राजकीय आंदोलने आणि अडथळे ?. हे जनतेला मतदारांना मूर्ख बनविण्यासाठी असतात. काही करून सत्ता काबीज केलीच पाहिजे हे सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख उधिष्ट असते हे दाखवुन दिले.
देशात दरवर्षी प्रचंड जनआंदोलन होतात.त्यात अपयश आले की नेते आत्महत्या करीत नाही. पण काही भावनिक भक्त आत्महत्या करतात.असंघटित कामगार हा संपूर्ण मागासवर्गीय समाजातील आहे.ज्यांना गावी शेतजमीन नाही,तो मोलमजुरी करून जगतो. पण जातीच्या आंदोलनात सर्वात पुढे असतो.अमके धमके आगे बढो!. हम तुम्हारे साथ है!. बेबीच्या देठा पासुन घोषणा देतात. त्यांच्या रोजीरोटी साठी काही नाही केले तरी चालेल त्यांच्या सुखा दुःखात सहभागी झाले नाही तरी चालेल.तरी जातीच्या प्रश्नांसाठी महापुरुषांची फसवणूक करण्यासाठी तुम आगे बडो!.असे म्हणणारा मागासवर्गीय समाज नेहमीच आघाडीवर असतो.पदोन्नती आरक्षण हे कायमस्वरूपी नोकरी करणाऱ्यासाठी आहे.तरी काही असंघटित कामगार व त्यांचे जिगरबाज नेते कायदा सुव्यवस्था मोडून नेते बनण्याचा शॉटकट मारतात.थोडे दिवसनी म्हणतात आमच्यावरील गुन्हे माफ करा. 
आपली जात न विसरता शेतकऱ्यांनी अनेक मोर्चे आंदोलन केली प्रत्येक वेळी झेंडा व पक्ष वेगळा होता.आजचा सत्ताधारी तेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हाचा शेतकरी मोर्चा माओवादी नव्हता,हिंदुत्ववादी,मनुवादी होता.आजचा शेतकरी लाल बावटा घेतलेला काळा मळकट चेहरा व कपडे घातलेला होता. म्हणूनच तो शेतकरी कमी (कम्युनिस्ट माओवादी) रानावनात राबणारा शेतमजूर जास्त होता. तेव्हाचे शेतकरी मोर्चे कधी पायी नसत त्यांचासाठी गाड्याची विशेष व्यवस्था असायची त्यांचे चेहरे व कपडे काळे मळकट दिसणार नाही यांची दक्षता घेतली जात होती.कारण तो शेतकऱ्यामधील साधन शेतकरया पेक्षा  राजकारणातील असंतुष्ट नेता जास्त होता. त्यात त्यांच्याकडे काम करणारा कामगार व मजूर मालकाच्या आदेशानुसार सहभागी होत होता. म्हणूनच तो शेतकरी होता.म्हणूनच आंदोलन झाली पण आत्महत्या नाही,आणि अडथळे तर नाहीच नाही. त्यांच्या साठी पोलीस,प्रशासकीय यंत्रणा प्रिंट चॅनल मीडिया हात जोडून उभी असायची.
वंचित शोषित पिढीत मागासवर्गीयांचा समाजाचा मोर्चा म्हणजेच नक्षलवादी.कारण अन्याय अत्याचार सहन न करता त्याविरोधात आवाज उचलून संघर्ष करणारा नक्षलवादी ठरविण्याचा उच्चवर्णीय मान्यताप्राप्त सरकारी प्रशासकीय आदेश असतो.त्याला प्रशासकीय जाहिराती मिळणारे वृत्तपत्र आणि चॅनल मीडिया भरपूर प्रसिद्धी देतात.ते प्रसिध्द माध्यमाचे कात्रण कोर्टात पुरावा म्हणून ग्रहाय धरल्या जाते.मग अधिकृतपणे वंचित शोषित पिढीत मागासवर्गीयांचा समाजाचा मोर्चा आंदोलन म्हणजेच नक्षलवादी कारवाया ठरविल्या जातात.राजकीय जनआंदोलन,शेतकऱ्यांची आत्महत्या आणि प्रशासकीय अडथळे येणारच ही परंपरा आज ही कायम ठेवली जात आहे.
एक मराठा लाख मराठा ही कुणाची कल्पना होती माहिती नाही.पण ही टॉग लाईन मोठी झाली त्यामुळे गरीब श्रीमंत मराठा आपले पक्ष संघटना विसरून एक दिवसासाठी एकाच प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एकत्र आले. लक्षवेधी 57 अभूतपूर्व मोर्चे शांततेत काढले. त्यातुन एकही राज्यपातळीवर सामाजिक,राजकीय नेतृत्व करणारी व्यक्ती पुढारी म्हणून पुढे आली नाही.राजकीय अस्थिरता निर्माण झाली नाही.सर्वच राजकीय पक्षांनी रस्त्यावर आंदोलनात सहभाग व जाहीर पाठिंबा दिला.पण विधानसभेत,विधानपरिषदेत पक्षहित विचारधारा आणि राजकीय लाभ डोळ्यासमोर ठेवला.त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आंदोलन हिंसक नाही बनले.मग आताच का मराठा मोर्चा हिंसक बनला?. कारण मराठा आंदोलनामुळे समाजात प्रचंड असंतोष निर्माण व्हावा त्यातुन जातीय दंगल घडावी अशी पेशवा सरकारची इच्छा होती. ते शक्य झाले नाही म्हणून आपलेच माणस मोर्चात पाठवुन तोडफोड करावी त्यामुळे आपोआप जमाव हिंसक बनेल आणि तोडफोड होईल त्याचे जातीय दंगलीत रूपांतर होईल अशी योजना पेशवा सरकारची होती.त्यामुळे आंदोलन,आत्महत्या आणि अडथळे कसे निर्माण होतील यांचे ही नियोजन होते.पण तसे गंभीर प्रकरण घडलेच नाहीत.काही तुरळक लक्षवेधी घटना घडल्या त्यातील आरोपी पकडल्या गेले असतील परंतु त्यांचा तपशील आज पर्यंत जाहीर झाला नाही.पण मराठा क्रांती मोर्चात समाजकंटक घुसले त्यांनी हे कृत्य केले असे मोर्चाचे समनव्यक व सरकारच सांगते.मग मराठा मोर्चात समाजकंटक कुठून आले हा प्रश्न आता अधांतरी राहिला.
मराठा,ओबीसी,धनगर समाजाच्या मोर्चात मोठा धमाका करण्याचे नियोजन होते. हे नालासोपारा,सातारा, कोल्हापूर पुणे येथील सनातनी देशभक्त आणि शिवभक्त शिवप्रतिष्ठानचे आज्ञाधारक साधक,धारकरी यांच्या घरी प्रचंड साठ्या सह पकडले पोलिसांनी आपली कर्तव्यदक्षता दाखविली. पण पेशवा सरकारच्या गृहमंत्री असलेल्या संस्कारीत पारदर्शक कारभार करणाऱ्याने ए टी एस प्रमुखाची तडकाफडकी बदली करून टाकली.आणि आपला वैचारिक वारसा दाखवून दिला. त्याबाबत समाजात प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया उमटली पाहिजे होती.प्रिंट,चॅनल मीडियाने यावर रान पेटविले पाहिजे होते. पण असे काहीच झाले नाही,उलट वैभव राऊत च्या समर्थानात हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. ते कोण होते देशप्रेमी?, धर्मरक्षक?. की गोरक्षक?. त्याच्या आंदोलनाला समाजाचा सरकारचा मूक पाठिंबा होता.त्यातील कोणीच आत्महत्या केली नाही आणि त्यात अडथळे  निर्माण करणाऱ्या ए टी एस पोलीस अधिकाऱ्यांना अलगत बाजूला केले.यांचा देशातील तमाम मागासवर्गीय समाजाने गांभीर्याने विचार केला पाहिजे, आरक्षण मांगण्यासाठी आंदोलन बंद करा. निराश होऊन आत्महत्या करू नका,अडथळे निर्माण करणाऱ्या यंत्रणेला सुधारण्यासाठी आपल्यात वैचारिक सुधारणा करा म्हणजे आरक्षणाचे राजकिय जनआंदोलन आणि अडथळे ?. का कशासाठी स्वाभिमानी जगण्यासाठीच नां?. मग आपण कोणत्या विचारधारेचे समर्थक आणि विरोधक आहोत हे एकदा शांतपणे विचार करून ठरवा.
आरक्षण मिळाल्यास किती लोकांना लाभ मिळेल?. आत्महत्या केल्यास कोणाचे नुकसान होईल?, आणि अडथळे निर्माण करणारे कोण आहेत?.खेड्या पाड्यातील मतदारांनी जातीपातीच्या पक्षाच्या भिंती पाडून उमेदवार निवडून दिला.आरक्षणासाठी,शेतकऱ्यांच्या साठी, महागाईसाठी,शिक्षणाच्या बाजारीकरणासाठी, बेरोजगारीसाठी, विविध पक्षांनी केलेली राजकीय जनआंदोलने खरेच ह्या समस्या सोडवण्यासाठी होत्या काय?. हा आज प्रश्न पडतो. आता यापुढे कोण कोणा विरोधात राजकीय जनआंदोलन करेल आणि त्यात अडथळे कोण निर्माण करेल व सोडविल. कोणत्या जातीच्या लोकांनी कोणत्या पक्षावर विश्वास ठेवावा.शेतकऱ्यांनी,बेरोजगारांनी,कामगारांनी मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांनांनी कोणत्या नेत्यावर विश्वास ठेऊन जन आंदोलनात सहभाग घ्यावा.कारण ही सर्व राजकीय जन आंदोलने आणि अडथळे भारतीय संविधानाच्या चौकटी मोडून काढण्यासाठी आणि स्वार्थासाठी होते. सरकार कोणाचे ही असो ते जनतेचे आपल्या परीने शोषण करणारेच असेल हे मात्र निश्चित झाले आहे.आरक्षणातील पदोन्नती आणि मराठा आरक्षण यातील फरक कोणाच्या लक्षात का येत नाही.मराठा समाजाला आरक्षण शिक्षण,नोकरी साठी ओबीसीच्या कोट्यातून नव्याने पाहिजे. तर पदोन्नती आरक्षण हे सध्या नोकरी करीत असलेल्या मागासवर्गीय कर्मचारी,अधिकारी यांना मिळणार होते.एक मराठा लाख मराठा आंदोलन पदोन्नती साठी नव्हते.मग हे सर्व आरक्षणाचे राजकीय जनांदोलन आणि अडथळे यांचा सर्व समाजानी गांभियाने विचार केला पाहिजे.सर्व समाजात बंधूभाव मैत्री भावना वाढली पाहिजे.वैर भावना वाढवून कोणाचाच फायदा होणार नाही.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई 9920403859,
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य 

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *