केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन
चंद्रपूर,
केंद्रातील मोदी सरकारने मागील सात वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नसल्याचा आरोप करीत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने गिरणार चौकात रविवारी निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेविका सुनिता लोढिया आदींची उपस्थिती होती. यावेळी काळ्या रंगाचा मुखवटा असलेल्या प्रतिकात्मक पुतळ्यावर केंद्र सरकारच्या अपयशाच्या विषयांचे फलक लावण्यात आले होते. आंदोलनात विनोद दत्तात्रय, के. के. सिंग आदी सहभागी झाले होते.