Breaking News

वर्ध्यात वादळ, समुद्रपूर-पुलगावात पाऊस

वर्धा,
जिल्ह्यात आज रविवारी दिवसभर कडाक्याचे उन्ह तापले. सायंकाळच्या सुमारास सर्वत्र ढग दाटून आले असले तरी काही भागात फक्त वादळ, काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी तर समुद्रपूर व पुलगाव येथे जोरदार पाऊस झाला. वर्ध्यात 4 वाजताच्या सुमारास सरी आल्या तर रात्रीपर्यंत फक्त वादळ होते. समुद्रपूर : परिसरात सायंकाळी 4.30 च्या दरम्यान जोराच्या वार्‍यासह रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या पाऊस झाला. त्यामुळे वातावरणातील थोडासा थंडवा निर्माण झाला. शेतकर्‍यांत खुशी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

पुलगाव
पुलगाव शहरात दररोज सायंकाळी आभाळ भरून येत होते व वारा सुटत होता. परंतु, पाऊस हुलकावणी देत होता. आज मात्र मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सायंकाळी 6 च्या दरम्यान पुलगावकरांनी अनुभवला. सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता. वार्‍यामुळे कुठेही नुकसान झाल्याची वार्ता नाही. वडनेर : सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास पावसाने वडनेर परिसरात जोरदार हजेरी लावली. दुपारी चार वाजेपर्यंत प्रखर उन्हाच्या झळा असह्य होत असताना वातावरणात अचानक बदल होऊन काळे ढग दाटून विजाच्या कडकडाटासह पुर्वमोसमी जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली. वडनेर, दारोडा येथे सुमारे एक तास जोरदार पाऊस पडला. पावसाचा जोर कमी झाला असला तरी विजाचा कडकडाटात सुरू होता. परिसरातील अनेक गावात पावसाचे आगमन झाले.

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *