गडचांदूर भाजपतर्फे सलग चार दिवस कोविड संबंधी जनहिताचे कार्यक्रम.
(मोदी सरकारच्या सप्त वर्षपूर्तीचे औचित्य.)
कोरपना(ता.प्र.)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सात वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण झाला.या सप्त वर्षपूर्तीच्या निमित्याने भाजपच्या वतीने कोविड संबंधी जनहिताचे कार्यक्रम आयोजित केले जात आहे.कोरोना योध्दांचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या हेतुने वित्त व नियोजन मंत्री तथा लोकलेखा समिती अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार,माजी केंद्रीयमंत्री हंराज अहीर यांच्या सूचनेनुसार माजी आमदार अँड.संजय धोटे,भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजप जिल्हा महिला अध्यक्ष कु. अल्काताई आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर भाजपतर्फे सलग चार दिवसांपासून कोरोना योद्धांचा सत्कार,रक्तदान शिबीर,मास्क वाटप,कोविड लस संबंधी जनजागरण असे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले.सुधीर मुनगंटीवारतर्फे गडचांदूर भाजपला आक्सीजन कान्सट्रेटर मशीन भेट देण्यात आली.
कोरोनाने मागील दीड वर्षापासून अख्ख्या जगाला अक्षरशः वेठीस धरले आहे.याच्या संसर्गाच्या भीतीने सध्याच्या परिस्थितीत कोरोना रुग्ण असलेले अगदी जवळचे मित्र व नातेवाईकांची भेट घेणे धोकादायक बनले आहे.कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत गडचांदूरात आजपर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे.यांचा अंत्यसंस्कार येथील न.प.आरोग्य विभागातर्फे करण्यात आला.सदर अंत्यविधी पार पाडताना या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांचे अंत्यसंस्कार केले.ही बाब जगापुढे यावी.या उद्देशाने गडचांदूर शहर भाजपतर्फे न.प.चे आरोग्य विभाग प्रमुख स्वप्नील पिदूरकर,प्रमोद वाघमारे,नार्वेकर यांचा शाल,श्रीफळ,टिफीन बॉक्स,पाण्याची बाँटल, फळे व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
————//———-
“भाजयुमो तर्फे रक्तदान शिबीर.”
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.ही बाब लक्षात घेता भाजप कोरोना ऍक्शन टीमच्या मार्गदर्शनात भाजयुमोतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली.यात २० युवकांनी रक्तदान केले.विशेष म्हणजे सध्या परिस्थितीत जिल्ह्यात o+ रक्तगटाच्या रक्ताची कमतरता असल्याचे कळते.नेमका याच गटाच्या ९ रक्त दातांनी सदर शिबीरात रक्तदान केले. रक्तदात्यांना सन्मान पत्र,मास्क आणि छत्री तसेच भेट देऊन सन्मानित तसेच रक्त संकलन करणाऱ्या टीमला सुद्धा आगामी पावसाच्या पार्श्वभूमीवर छत्री भेट देऊन आभार व्यक्त करण्यात आला.
————–//———-
“महिला आघाडीतर्फे रुग्ण वाहिका चालक, आशा वर्कर,पर्यवेक्षकांचा सत्कार.”
कोरोना महामारीत कुटुंब व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णवाहिका चालकांनी अविरतपणे रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याचे महान कार्य केले.यांच्यामुळे अनेकांचे जीव वाचले.यांची कामगिरी जगापुढे यावी या उदात्त हेतूने भाजप महीला आघाडी तर्फे चालक बब्लू राठोड,शंकर लोणारे,संतोष आडे, विनोद यलमुले यांचा टिफीन बॉक्स,पाणी बाँटल व पौष्टिक फळे देवून सत्कार करण्यात आला.तसेच कोरोना महामारीत शहरातील आशा वर्कर,पर्यवेक्षकांनी मोठे पत्करत घरोघरी जावून नोंदी करणे,ताप तपासणे,आक्सीजन लेव्हल घेणे,बाधीतांना औषधी पुरवणे इत्यादी काम सातत्याने करीत आहे.ही बाब लक्षात घेता यांना छत्री,साबन व पौष्टिक फळ देवुन सत्कार करण्यात आला.तसेच याकाळात आरोग्य अधिकारी स्वप्नील टेंभे यांनीही उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल महिला आघाडीतर्फे त्यांचेही शाल,श्रीफल व भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला.
सलग चार दिवस भरगच्च अशा कार्यक्रमात गडचांदूर भाजप शहराध्यक्ष सतीष उपलेंचीवार,भाजप नेते निलेश ताजने, नगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे,संदीप शेरकी,मधुकर कोहळे,जेष्ट नेते महेश शर्मा,भाजप महिला मोर्चा जिल्हा महामंत्री तथा गडचांदूर न.प.च्या माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,जिल्हा सचिव सौ.रंजना मडावी,सौ.नीता क्षीरसागर, सौ.सपना सेलोकर,हरीष घोरे,अजी़म बेग,शंकर आपुरकर,जसराज धुत,तुषार कलोटे,रवी गेलडा,शंकर क्षीरसागर,गणपत बुरडकर,योगेंद्र केवट,राकेश अरोरा, राकेश गोरे,अरविंद कोरे, गणपत बुरडकर,परशुराम मुसळे,प्रशांत गौरशेट्टीवार,रवी गेल्डा,प्रकाश कटीस्कर,सुयोग कोंगरे,भास्कर उरकुंडे,विलास क्षीरसागर,उद्धव पुरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.