Breaking News

गडचांदूर भाजपतर्फे पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार.

गडचांदूर भाजपतर्फे पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार.
कोरपना(ता.प्र.):-
        कोरोनाने मागील दीड वर्षापासून थैमान घातले असून अशा महा संकट काळात डॉक्टर, नर्स,आशा वर्कर,पोलीस,रूग्णवाहीका चालक इत्यादींसह पत्रकारांची भुमिकाही कौतुकास्पद असून जीवाची पर्वा न करता सध्याच्या कोरोना महामारीत घडणार्‍या प्रत्येक घडामोडी पत्रकार बांधव आपल्या लेखणीतून जनतेपुढे मांडत आहे.यांचाही समावेश कोरोना योद्धांच्या श्रेणीत असून यांच्या कार्याची कुठेतरी प्रशंसा व्हावी,असे मत गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीष उपलेंचीवार यांनी व्यक्त केले.केंद्रातील मोदी सरकारच्या सप्त वर्षपूर्तीचे औचित्य साधून गडचांदूर भाजपच्या वतीने २ जून रोजी आयोजित भाजप कार्यालयात “पत्रकार” बांधवांच्या एका छोटेखानी सत्कार समारंभात ते बोलत होते.
 कोरोना योध्दांचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या हेतुने वित्त व नियोजन मंत्री तथा लोकलेखा समिती अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीयमंत्री हंराज अहीर यांच्या सूचनेनुसार माजी आमदार अँड.संजय धोटे, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजप जिल्हा महिला अध्यक्ष कु.अल्काताई आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर भाजपतर्फे कोरोना योद्धा म्हणून पौष्टिक फळे,छत्री,मास्क व आरोग्यदायी आयुर्वेदिक गोळ्या भेट देऊन स्थानिक पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मोठ्यासंख्यने पत्रकार बंधवांची उपस्थिती होती.कोरोना महामारीत भाजपचे योगदान उल्लेखनीय असून सत्कार केल्याबद्दल पत्रकार बांधवांनी संबंधितांचे मनापासून आभार मानले आहे.यावेळी गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीष उपलेंचीवारसह नगरसेवक रामसेवक मोरे, नगरसेवक अरविंद डोहे,संदीप शेरकी इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रास्ताविक नगरसेवक डोहे तर आभार संदीप शेरकी यांनी व्यक्त केले.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *