Breaking News

जिल्हा बार अधिवक्ता संघ तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन,शिबिरात ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान

चंद्रपूर-

दिनांक ०२ जून २०२१ ला सकाळी ०९ .३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत आय एम ए सभागृह, गंजवार्ड, चंद्रपुर येथे मानवता हि सेवा अधिवक्ता संघ आणि चंद्रपूर जिल्हा बार अधिवक्ता संघ तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कोरोना महामारीच्या काळात चंद्रपुर जिल्ह्याच्या सगळ्या शासकीय रुग्णालयात आणि खाजगी रुग्न्यालयात चंद्रपुर जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातून रुग्णांना भर्ती केले जाते. त्या रुग्णांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते व रक्ताची गरज लक्षात ठेवून या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कोरोना महामारीच्या काळात मानवता हि सेवा अधिवक्ता संघ व जिल्हा अधिवक्ता संघ तर्फे अधिवक्तांसाठी,अधिवक्तांच्या परिवारासाठी व चंद्रपूरच्या नागरिकांसाठी विविध सेवा कार्य करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. चंद्रपूरच्या अधिवक्तांनी आणि नागरिकांनी रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. रक्तदान शिबिरात महिलांनी सुद्धा रक्तदान केलेले आहे. सर्व रक्तदात्यांना चंद्रपूर शासकीय रुग्णालय रक्तदान विभाग तर्फे प्रमाणपत्र दिले गेलेत. या रक्तदान शिबिराच्या आयोजकां तर्फे अशे मनोगत व्यक्त करण्यात आले कि रक्तदान केल्याने मानव शरीराला कोणतेही नुकसान होत नाही आणि चंद्रपुरच्या अनेक समजासेवी अधिवक्तांनी व नागरिकांनी रक्तदान करून समाज कार्यात आपले सहकार्य केले आहे.या रक्तदान शिबिरात चंद्रपूर जिल्हा बार अधिवक्ता संघाचे सचिव एड.संदीप नागपुरे, एड.अभय पाचपोर, एड.आशिष धर्मपुरीवार, एड.इंदर पुगलिया, एड.विनय लिंगे, एड.राजेश ठाकूर, एड.नितीन गटकीने, एड.राजेश जुनारकर, एड.निलेश दलपेलवार, एड.सचिन उमरे, एड.भूषण वांढरे, एड.प्रदीप क्षीरसागर, एड.मनोज मांदाडे, एड.किरण पाल, एड.लालजी जेम्स, एड.किरण आवारी, एड.जय पंजाबी, एड.अशोक चकरापुरवार, एड.पुंडलिक देवतळे, एड.तबस्सुम आयुब शेख, एड.तृप्ती मांडवगडे, एड.देवराव धोडरे आणि इतर सन्माननीय अधिवक्तांनी सहकार्य केले. या शिबिराच्या सफल आयोजन साठी आयोजकांच्या वतीने एड.आशिष मुंधडा यांनी रक्तदान केल्याबद्दल सर्व रक्तदातांचे आभार प्रकट केले व चंद्रपूर प्रशाकीय रुग्णालयाच्या रक्तदान विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *