गडचांदुर (प्रतिनिधी : ओधौगिक नगरी गडचांदुर नगरपरिषदचा ढिसाळ कारभाराचे पितळ पहिल्याचं पावसात उघडे पडले आहे . काल दि .१० जुनला शहरात झालेल्या पावसाने प्रभाग मधील आंबेडकर भवन नजीक शुध्द पिण्याच्या पाण्याच्या ए. टी. एम. समोरच नालीतील सांडपाणी घाण कचरा जमा होऊन दल – दल निर्माण झाली आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . सदर ए. टी. एम. चे बांधकाम करतांना नगरपरिषदेने कुठलेही नियोजन न करताच सखल भागात ए. टी. एम. निर्माण केले, त्यामुळे आजूबाजूला असंनाऱ्या नालीतील घाण-कचरा ए. टी. एम. समोरच जमा होतो .तर ए.टी.एम च्या सांडपाण्याची कुठलीही व्यवस्था नगरपरिषदेने केले नाही .नगरपरिषदेच्या गलथान कारभाराने शुध्द पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे गडचांदूर न.प. च्या आरोग्य विभागाच्या कारभार हा मेकॅनिकल इंजिनिअर असलेले स्वप्निल पिदुरकर यांचेकडे आहे. पहिल्याच पावसात शुद्ध पाण्याच्या एटीएमची झालेली अवस्था ही न.प.कारभाराचे वाभाडे काढणारी आहे.