जगातील सर्वात जुनी संस्कृती असलेल्या सिंधू समाजाच्या प्राचीन परंपरेची महती सर्वांपर्यत पोचविण्यासाठी नागपूर येथे लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’ स्थापन करण्यात येईल. यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून १४० कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्राप्त झाला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जाहीर केले. महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमात फडणवीस बोलत …
Read More »मराठ्यांची एक मागणी मान्य होऊ शकत नाही : देवेंद्र फडणवीस रोखठोक
मागील सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला यश आलं आहे. शुक्रवारी (२६ जानेवारी) मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं राजपत्र मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी (नवी मुंबई) येथे आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवलं. राज्य सरकारने मनोज …
Read More »कार चार वेळा पलटली आणि आमदार…!
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार (शरद पवार गट) राजू तिमांडे यांच्या गाडीचा शुक्रवारी सायंकाळी जोरदार अपघात झाला. त्यांची पत्नी नंदा, पुत्र सौरव तिमांडे तसेच कारचालक हे अमरावती-वर्धा रस्त्याने येत होते. ते सर्व देवगाव फाट्याजवळ असणाऱ्या एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासासाठी हिंगणघाटकडे निघाले होते. वर्धेजवळील दहेगाव स्टेशनजवळ असताना त्यांची गाडी एकाएकी उसळली. गाडी चार वेळा पलटली. काचा फुटल्या. …
Read More »राज्यात सर्वत्र थंडी : पारा दहा अंशांच्या खाली
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे राज्यात किमान तापमानात घट झाली आहे. राज्याच्या बहुतेक भागात कमाल आणि किमान तापमानात घट झालेली दिसून येत आहे. किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. दिवसाही गार, बोचरे वारे वाहत असल्यामुळे राज्यभरात थंडी जाणवत असून, आबालवृद्धांना हुडहुडी भरली आहे. दिवसभरात सर्वांत कमी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पुण्यात झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, …
Read More »राज्यात ऍम्ब्युलन्सची संख्या वाढणार : नवजात शिशू रुग्णवाहिका सेवा
नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व ‘बोट’ रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत १०८ सेवेद्वारे ९३७ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत असून त्यात आणखी ८१९ रुग्णवाहिकांची वाढ केली जाणार आहे. १७५६ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहेत. गेल्या १० वर्षात राज्यातील असंख्य रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेचा लाभ झाला. अनेक नवजात बालकांचा जन्म …
Read More »भूकंपाने नागरिक हादरले : कोणता तालुका? वाचा
मकर संक्रांती सणादिवशी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. आज (दि.१५) सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटाच्या सुमारास धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात धक्का जाणवला. दिल्ली येथील भूकंप मापन केंद्रात २. ३ रिस्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. लोहारा तालुका हा भूकंपग्रस्त तालुका असून भुकंप प्रवण क्षेत्रात येतो. १९९३ साली झालेल्या महाप्रलंयकरी भूकंपाच्या कटू आठवणी अजून नागरिक विसरलेले नाहीत. अधूनमधून तालुक्याला भुकंपाचे धक्के …
Read More »श्री राम : २२ जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर होणार?
अयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पण, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात कार्यक्रम होत आहेत.त्याच धर्तीवर राज्यात २२ तारखेला सुट्टी जाहीर करावी, यावर विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना करणार आहे, अशी महिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात सहा हजार किलोचा शिरा करण्यात येणार आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हा शिरा बनवतील. यानिमित्ताने मोठे आयोजन महालक्ष्मी …
Read More »पीएच.डी.चाळणी परीक्षेचा पेपर फुटला : नागपूर/संभाजीनगर केंद्र
राज्य शासनाच्या ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’ या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी बुधवारी दुसऱ्यांदा घेतलेल्या चाळणी परीक्षेचा पेपर सुरू होण्याआधीच फुटल्याचा आरोप करीत परीक्षार्थीनी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील केंद्रावर आंदोलन केले. सरकार पारदर्शक परीक्षा घेऊ शकत नसल्याने चाळणी परीक्षा रद्द करून सर्व अर्जदारांना सरसकट अधिछात्रवृत्ती लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, परीक्षा घेणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे …
Read More »तलाठी भरती : ‘टीसीएस’ कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नातलग गुणवत्ता यादीत?
तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर अनेक नवे प्रकार समोर येत आहेत. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीतील एका कर्मचाऱ्याची पत्नी आणि बहिणीचा पती गुणवत्ता यादीमध्ये पहिला आल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. तलाठी भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात अनेक उमेदवारांना एकूण २०० गुणांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ‘नॉर्मलायझेशन’नंतर गुणवाढ झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु, तलाठी …
Read More »निव्वळ चर्चा आणि आरोप : तलाठी भरती रद्द केल्यास चुकीचा संदेश जाणार
तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज नवीन गोंधळ समोर येत आहे. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोघा सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण असल्याचे उघड झाले आहे. तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत. राज्य सरकार जाणीवपूर्वक याचा तपास न करता उलट आमच्याकडेच पुरावे मागत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. तलाठी भरती घोळ झाल्याचा पुरावा असल्यास द्यावा, असे …
Read More »
विश्वभारत News Website