जिल्ह्यात 218 कोरोनामुक्त, 85 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू चंद्रपूर, दि.6 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 218 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 85 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या 85 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 16, चंद्रपूर तालुका 10, बल्लारपूर 8, भद्रावती 11, ब्रम्हपुरी 6 , नागभिड 3, सिंदेवाही 2, मूल 3, सावली 1, पोंभूर्णा 3, गोंडपिपरी 1, राजूरा 11, चिमूर 0, वरोरा 4, कोरपना 6, जिवती 0 …
Read More »कोरोना नियमांचे पालन करूनच नागरिकांनी व्यवहार सुरू ठेवावेत – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
Ø कोविड परिस्थितीचा घेतला आढावा Ø नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे Ø लसच आपल्याला तिसऱ्या लाटेपासून वाचवेल. वर्धा, दि 6 जून (जिमाका):- आपला जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषातील तिसऱ्या टप्प्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली असली तरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून व्यवसाय आणि व्यवहार करणे आवश्यक आहे. अति उत्साहामुळे आपल्या कुटुंबाला आणि जिल्ह्याला आपण पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत घेऊन …
Read More »पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारली शिवशक राजदंड गुढी , शिवस्वराज्य दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारली शिवशक राजदंड गुढी शिवस्वराज्य दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा वर्धा, दि 6 जून (जिमाका):- महाराष्ट्राच्या जनतेला एका चैत्यन्य सूत्रात बांधून महाराष्ट्राचे सत्व आणि स्वत्व जोपासणाऱ्या राजकीय इतिहासाची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. दीर्घकाळ परकीयांची राजवट आणि अनागोंदी अनुभवणाऱ्या महाराष्ट्राच्या रयतेला स्वातंत्र्य आणि सुबत्ता मिळवून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी …
Read More »विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन चळवळ पुढे न्यावी- डी.के.आरिकर
वृक्षारोपण, पर्यावरण मित्र व कोविड योद्धा पुरस्कार जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण संवर्धन समितीचा उपक्रम चंद्रपूर- मानवाने पर्यावरणाच्या केलेल्या हानीमुळे आज त्याचेच जीवन संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे त्यामुळे भविष्यातील आरोग्य संपन्न समृद्ध मानवी जीवनासाठी विद्यार्थ्यांनी हा विषय समजून घ्यावा व पर्यावरण दूत होऊन मानवी जीवन वाचवावे व वृक्षसंवर्धन चळवळ पुढे न्यावी असे आवाहन दलीतमित्र व पर्यावरण समिती चे अध्यक्ष डी.के.आरिकर …
Read More »वृक्षवल्ली आम्हा सोयरे….! जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने साईशांती नगरात वृक्षारोपण.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे….! जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने साईशांती नगरात वृक्षारोपण. कोरपना(ता.प्र.) :- कोरोना महामारीत आक्सीजन अभावी कित्येकांचे जीव गेले.मानवी जीवनात आक्सिजनचे महत्व कदाचित याकाळात सर्वांनी अनुभवलेच असावे यात दुमत नाहीच. लोकवस्ती व इतर विकास कामांसाठी जंगल कटाई मोठ्याप्रमाणात सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.यामुळे वृक्ष लागवड कमी आणि कटाई जास्त असे चित्र असून नैसर्गिकरीत्या मोफत मिळणारे …
Read More »रस्त्याचे भूमिपूजन थाटामाटात आता कामाची सुरुवात कधी ? (नागरिकांचा प्रश्न)
रस्त्याचे भूमिपूजन थाटामाटात आता कामाची सुरुवात कधी ? (नागरिकांचा प्रश्न) कोरपना(ता.प्र.):- कोरपना तालुक्यातील वनसडी,पिपर्डा, कारगाव(बु)रस्त्याचे खडीकरण व मजबूतीकरणाची कामे २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाल्याचे कळते.सदर मार्ग हा ८ ते १० गावांकडे व पकडीगुड्डम डॅमकडे जाणारा व दोन तालुक्याला जोडणारा मार्ग असून याकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोप होत आहे.सदर मार्ग हा विविध वाहने व नागरिकांना गैरसोयीचा …
Read More »आज संभाजीराजे मांडणार मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका
आज संभाजीराजे मांडणार मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका कोल्हापूर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिले असून, छत्रपती संभाजीराजेंसह केवळ २२ जणांच्या उपस्थितीत रायगडावर हा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी राज्याभिषेकासाठी शिवमुद्रा असणार आहे. या सोहळ्यामध्येच खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची …
Read More »डोणी जंगलात वाघिणीचा मृत्यू
डोणी जंगलात वाघिणीचा मृत्यू मूल- तोडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्या बफर क्षेत्रातील मूल वनपरितक्षेत्रच्या नियत क्षेत्र डोणी-1 कक्ष क्रमांक 327 मध्ये शनिवार, 5 जून रोजी 10 वाजताच्या सुमारास एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती वरिष्ठ वनाधिकार्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृत वाघणीला चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात आणून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिचे दहन करण्यात …
Read More »कोविडमुळे पालक गमविलेल्या बालकांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी नियोजन करा – जिल्हाधिकारी गुल्हाने
कोविडमुळे पालक गमविलेल्या बालकांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी नियोजन करा – जिल्हाधिकारी गुल्हाने Ø तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालकांसाठी 10 टक्के बेड राखीव चंद्रपूर, दि. 5 जून : कोरोनाच्या माहामारीत अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमाविले आहेत. यात अनेक बालके सुद्धा अनाथ झाली आहेत. या बालकांची योग्य काळजी आणि संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा बालकांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन …
Read More »माझी वसुंधरा अभियानात चंद्रपूर महानगरपालिकेला आठवा क्रमांक ,ठाणे प्रथम, नवी मुंबई द्वितीय, बृन्हमुंबई तृतीय
माझी वसुंधरा अभियानात चंद्रपूर महानगरपालिकेला आठवा क्रमांक ठाणे प्रथम, नवी मुंबई द्वितीय, बृन्हमुंबई तृतीय चंद्रपूर, ता. ५ : शासन निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत सन 2020-21 मध्ये अभियान राबविण्यात आले. यामध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेने यशस्वीरित्या उपक्रम पूर्ण केले. यात अमृत गटातून चंद्रपूर मनपाला …
Read More »