Breaking News

ऑरेंजसिटी

योग आणि सात्विक आहार हा लहान मुलांना कोरोना पासून वाचवेल – डॉ. शिल्पा चन्ने ( योगगुरु, आमरोली योगपीठ)

योग आणि सात्विक आहार हा लहान मुलांना कोरोना पासून वाचवेल – डॉ. शिल्पा चन्ने ( योगगुरु, आमरोली योगपीठ) आज मुले ऑनलाईन शाळा शिकत आहेत,ऑनलाईन गेमही खेळले जात आहेत ,ते आपल्या नातेवाईकांशी आणि मित्रांशी व्हिडिओ कॉलद्वारे  बोलत आहेत आणि टीव्हीवर देखील बोलत आहेत. अधिक वेळ स्क्रीनशी संलग्न आहे.  म्हणून पालकांना हवे आहे की त्यांची मुले निरोगी कशी राहतील? 2021 ला स्वीकार …

Read More »

आझाद बगिच्याचे सौंदर्यीकरण तातडीने पूर्ण करा , महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे निर्देश

महानगरपालिका पदाधिकाऱ्यांनी केली आझाद बगीच्याची पाहणी चंद्रपूर, ता. ८ : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद बगीच्याच्या नूतनीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम युद्धस्तरावर पूर्ण करण्याच्या सूचना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिल्या. मंगळवार, ता. ८ जून रोजी सायंकाळी पाच वाजता महापौरांनी बगिच्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, शहर अभियंता महेश बारई, …

Read More »

अबब…!नवीन टाकी बदबद लागली गळायला.

अबब…!नवीन टाकी बदबद लागली गळायला. (टाकीचे बांधकाम निकृष्ठ,नगरसेवकांच्या आरोपांना यामुळे दुजोरा,वरिष्ठांच्या भुमिकेकडे लक्ष.) कोरपना (ता.प्र.)          चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे औद्योगिक शहर गडचांदूर नगरपरिषदच्या सहाय्य निधीतून शहरातील मध्यभागी असलेल्या पाणीच्या नवीन टाकीचे बांधकाम संपल्यातच जमा आहे.टेस्टिंगसाठी सदर टाकीत पाणी भरण्यात आले.मात्र सदर टाकीच्या रिंगातून व मुख्य स्लॅब मधून बदबद पाणी …

Read More »

एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा वर्धा:प्रतिनिधी – एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे गेल्या 3 वर्षापासून आर्वी तालुक्यातील पांजरा, बोथली, उमरी, सुकळी, भादोड , या गावांमध्ये आदर्श गाव घडविण्याचे काम सुरू आहे , प्रकल्पामधून अनेक पर्यावरण पूरक उपक्रम कार्यकर्ते राबवित असतात. यामध्ये झाडे लावणे, पाणी वाचवा मोहीम , वन्य प्राण्यांचे संरक्षण, प्लास्टिक मुक्त …

Read More »

नरेगा कामावर मजूर उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर

नरेगा कामावर मजूर उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर Ø जिल्ह्यात 1495 कामांवर 62408 मजुरांची उपस्थिती चंद्रपूर, दि. 7 जून : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत संपुर्ण जिल्हयात ग्रामपंचायत स्तरावर मोठया प्रमाणात कामे सुरु असल्याने ग्रामीण जनतेला कोरोना महामारीच्या काळात मोठा आधार मिळाला आहे. जिल्ह्यात 1495 कामांवर एकूण 62408 मजुरांची उपस्थिती असून मजुरांच्या उपस्थितीबाबत चंद्रपूर जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर …

Read More »

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकारतून 15 प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर सेवेत रुजू

आणखी 15 प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर सेवेत रुजू   – आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार चंद्रपूर, माजी वित्तमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून आणखी 15 प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वितरित करण्यात आल्याने ही संख्या आता 167 झाली आहे. यापूर्वी 152 प्राणवायू कॉन्सेन्ट्रॅटरचे वितरण करण्यात आले. कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचे संकट कमी होत आहे. तरीही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. राज्यात तिसरी लाट …

Read More »

महागाईसाठी केंद्र सरकार जबाबदार – खा. धानोरकर – पेट्रोल, डिझेल दरवाढीविरुध्द काँग्रेसचे आंदोलन

महागाईसाठी केंद्र सरकार जबाबदार – खा. धानोरकर – पेट्रोल, डिझेल दरवाढीविरुध्द काँग्रेसचे आंदोलन चंद्रपूर, पेट्रोलने शंभरी गाठली आहे. डिझेल शंभरीच्या जवळपास आहे. गॅस सिलेंडर नऊशे झाला आहे. या महागाई वाढीला केंद्र सरकार जबाबदार आहे, असा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे सोमवार, 7 जून रोजी येथील आदर्श पेट्रोल पंप येथे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करीत केंद्र …

Read More »

ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्र वाढवणार  – नऊ गावांची जमीन संपादित करणार

ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्र वाढवणार – नऊ गावांची जमीन संपादित करणार मुंबई, ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये वन्य प्राण्यांकरिता गाभा क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी संबंधित चंद्रपूर आणि सिंदेवाही तालुक्यातील नऊ गावांच्या पुनर्वसनासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील कोअर क्षेत्र वाढविण्यासंदर्भात आणि आरे वनक्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत आज …

Read More »

विदर्भातील ग्राहकांचे वीज बिल माफ करावे – विदर्भ आंदोलन समितीची मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे मागणी 

* विदर्भातील ग्राहकांचे वीज बिल माफ करावे * विदर्भ आंदोलन समितीची मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे मागणी  चंद्रपूर, दिनांक 7 जून –             विदर्भात गेल्या तीन वर्षापासुन असलेली दुष्काळ सदृश स्थिती, कोरोना काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने रोजगार व उत्पन्ना अभावी नागरिक, व्यापारी, शेतकरी वीज बिल भरू शकले नाही, म्हणुन लॉकडाऊन काळातील सर्व वीजबिल माफ करावे यासह …

Read More »

क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे- सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज

क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज         दिल्ली, ७ जून, २०२१:“क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे” असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी रविवार, ३० मे, २०२१ रोजी व्हर्च्युअल रुपात आयोजित निरंकारी संत समागमामध्ये जगभरातील लाखोंच्या संख्येने जुडलेल्या निरंकारी भक्तगणांना व प्रभु-प्रेमी सज्जनांना संबोधित करताना व्यक्त केले. …

Read More »