औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात अंदाजे 900 जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 900 जणांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांनी औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेरचा लग्नसोहळा बुधवारी 4 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी …
Read More »गडकरींनी घटविले 56 किलो वजन : कोणते व्यायाम करतात?
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वजन कमी करून अनेकांना थक्क केले आहे. वजनच नव्हे तर एकूणच गडकरींच्या तब्येतीत सुधार दिसून येत आहे. करोनानंतर गडकरींनी आपल्या जीवनशैलीत केलेले काही बदल त्यांनी सांगितले.135 वरून 89 आणलेलं वजन आणि श्र्वसन संबंधित तक्रारी दूर करण्यासाठी योगा, प्राणायाम व व्यायामाची मदत झाल्याचे गडकरी सांगतात. पैसे हे जीवनाचं साधन आहे, ध्येय नाही, असं म्हणत गडकरींनी …
Read More »विदर्भात दोन दिवस पाऊस : हवेत वाढला गारठा
राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. किमान तापमानात घट झाल्याने नागपुरात कमालीचा गारठा वाढलाय. विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात गारठा कायम आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या उत्तरेकडील भागात गारठा कायम असला तरी, नागपूर आणि परिसरात काल (मंगळवार) रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे किमान …
Read More »‘जलसंपदा’चे अभियंता गोडसे यांना निलंबित करा : कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण
औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत लघुपाटबंधारे विभागात 2019 ते 2022 मध्ये विविध कामे करण्यात आली. मात्र,या कालावधीत विविध प्रकल्प, सिंचन वसाहतीवर कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेस. या कामासाठी निविदा काढल्या मात्र वृक्षारोपण कागदावर दाखवून मलाई खाण्यात आली. इतकेच नाही तर एकाच खड्यात दोन झाडे लावण्याचा पराक्रमही गोडसे …
Read More »पंकजा मुंडेंना मोठा धक्का ; नड्डांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही
2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाले. जे.पी. नड्डा यांच्या चंद्रपूर आणि औरंगाबाद दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. नुकत्याच बीड येथे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे …
Read More »नागपुरातील जैन कलार समाजाच्या निवडणुकीत घोळ
जैन कलार समाजाच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत मोठा घोळ झाल्याचा आरोप आपुलकी पॅनलचे अनिल तिडके यांनी पत्रकार परिषदेत केला.नागपूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती तिडके यांनी दिली. काय आहे प्रकरण?👇👇👇 26 डिसेंबरला समाजाची निवडणूक झाली. 27 डिसेंबरला मतमोजणी अपेक्षित होती. मात्र, तसे न होता तीन दिवसांनंतरही संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून निकाल घोषित करण्यात आलेला नाही. याच काळात घोटाळ्यांनी कूच केली. …
Read More »नववर्षासाठी नागपुरात २५०० पोलीस तैनात
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागपूर सज्ज आहे. तरुणाईची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. हॉटेल, पब, बार, तलाव अशा सर्वच ठिकाणी नववर्षाच्या जल्लोषाची व्यवस्था दिसून येत आहे. नागपुरात तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी ३९ चेकपोस्ट तयार आहेत. अधिवेशन आटोपताच या बंदोबस्तात पोलीस लागले. अप्रिय घटना टाळण्यासाठी अडीच हजारावर पोलीस सज्ज आहेत. वाहतूक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि विशेष पथक पोलिसही पहाटेपर्यंत रस्त्यावर पहारा असणार आहे. त्यामुळे …
Read More »क्रीडा स्पर्धेच्या नावावर तलाठी गायब : औरंगाबाद ‘महसूल’च्या कारभारामुळे जनता त्रस्त
✍️मोहन कारेमोरे महसूल आणि जनसामान्यांचे नाते आणखी घट्ट विणण्यासाठी राज्य सरकार अतोनात प्रयत्न करते. सामान्य नागरिकांची कामे लवकर व्हावीत, यासाठी तलाठी ते तहसीलदार आहेत. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती दिसून येते. औरंगाबाद जिल्ह्यात महसूल विभागातर्फे क्रीडा स्पर्धा आहेत. यात औरंगाबाद, पैठण,कन्नड, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर या तहसील मधील बरेच कर्मचारी सहभागी होतात. पण, काही तालुक्यातील तलाठी मागील 8-10 …
Read More »शिक्षण विभाग : पैशांशिवाय फाईल सरकेना, भाजप आमदारच हतबल
शिक्षण विभागात पैशांशिवाय फाईल पुढे सरकतच नाही. कोणत्याही कामासाठी अधिकारी-कर्मचारी पैसे मागतात, असा आरोप भाजपचे आमदार नागो गाणार यांनी केला. अशी प्रकरणे निदर्शनास आणून दिल्यास नक्कीच कारवाई करू, असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. नागपूर आणि अमरावती विभागातील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात पैशाची देवाण-घेवाण होत असल्याचा आरोप गाणार यांनी केला.
Read More »महसूल अधिकारी अडकणार : नागपुरातील रेती घोटाळ्याची एसआयटी चौकशी
महानिर्मितीच्या कोल वॉशरीजमधील नाकारलेल्या कोळशाच्या विक्रीत गैरप्रकार झाल्याची चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. त्याचप्रमाणे नागपुरातील रेती घोटाळय़ाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राजकारणी आणि बढ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रेतीत गुंतलेल्या पोलीस अधिकारी,तहसीलदार,नायब तहसीलदारांची चौकशी होऊ शकते. वॉशरीजच्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी या प्रकरणाच्या …
Read More »