✍️मोहन कारेमोरे नागपूर जिल्ह्यात अवैध रेती उत्खननाला सध्यातरी बऱ्यापैकी ब्रेक लागला आहे. याचे कारण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध भागात सीसीटीव्हीयुक्त 42 रेती तपासणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. यामुळे रेती तस्करी करणाऱ्यावर काही प्रमाणात अंकुश लागला आहे. नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अचानक काही रेती तपासणी चौकीला पहाटे-पहाटे भेटी दिल्याची माहिती आहे. यात मुख्यत्वे नागपूरच्या आसपासचा परिसर आहे. कामठी, मौदा …
Read More »बागेश्वर सरकारनी नागपुरात दावे सिद्ध करावे : प्रा. श्याम मानव
मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेश्वर सरकार यांनी भक्तांसमोर नव्हे तर नागपुरातील पत्रकार भवनात आपले चमत्काराचे दावे सिद्ध करावे, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी दिले. बागेश्वर सरकार यांचे समर्थक, विहिप, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटना नागपुरात शुक्रवारी रस्त्यावर उतरल्या. संविधान चौक येथे झालेल्या आंदोलनात अंनिसचे प्रा. श्याम मानव यांचा पुतळा …
Read More »जैन कलार समाज निवडणूक : निकालाला कोर्टाची स्थगिती कायम
जैन कलार समाज निवडणूक 25 डिसेंबर रोजी झाली. मात्र निवडणूक मोजणीसाठी तब्बल आठ दिवस लागले. त्यामुळे या निवडणूकीत घोळ झाला आहे, असा दावा विरोधकांनी केला असून धर्मादाय उपायुक्त न्यायालयात दाद मागितली आहे. यावर प्राथमिक सुनावणीत स्थगिती मिळाली. पुन्हा एकदा धर्मादाय उपायुक्तांनी ही स्थगिती 24 जानेवरीपर्यंत कायम ठेवली. जैन कलार समाज न्यासाच्या निवडणूकीत मतमोजणीतील घोळ आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य वर्तनामुळे धर्मादाय …
Read More »खऱ्हा न मिळाल्याने आरोपीने फोडले डोके : नागपुरमधील न्यायालयातील प्रकार
खऱ्हा न मिळाल्याने नागपूर जिल्हा न्यायालयात आरोपीने स्वतःचे फरशीवर डोके फोडले. सागर बोरधरे असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर हत्येचा आरोप आहे. त्याच प्रकरणात जिल्हा न्यायालयात सध्या खटला सुरु आहे. तो नागपूर कारागृहात कच्चा कैदी म्हणून आहे. त्याची शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजेरी होती. त्यावेळी त्याला न्यायालयात खालच्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. कुणालातरी त्याने खऱ्हा मागितला. मात्र, त्याला खऱ्हा मिळाला नाही. अखेर …
Read More »पार्किंगच्या वादात नागपुरात तरुणाचा खून
घरासमोर वाहन पार्क केल्याने दोन गटात वाद विकोपाला गेला. यात झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा खून झाला. ही घटना नागपुरातील यशोधरानगर परिसरात घडली. घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव योगेश धामने (वय 19) असे आहे.तो इंदिरा गांधीनगर परिसरातील रहिवासी होता. या घटनेत रामभाऊ शाहू व मोनू असे दोघे जण …
Read More »अनिल देशमुख घेणार नागपुरात फडणवीसांची भेट!
माजी गृहमंत्री अनिल देशमुख लवकरच नागपूरचा दौरा करणार असल्याचे कळते. “सध्या उच्च न्यायालयाने मुंबईबाहेर जाण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे या महिन्याच्या शेवटी कोर्टाची परवानगी घेऊन नागपूरमध्ये जाणार आहे. त्यावेळी मी विदर्भ तसेच माझ्या काटोल मतदारसंघाचा दौरा करणार आहे. कोर्टाची परवानगी घेऊन मी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच विदर्भात पक्षाचे काम करेन,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. शिंदे, फडणवीसांची घेणार भेट “मुख्यमंत्री …
Read More »तरुणाच्या फुप्फुसात अडकली सुई आणि…
जालना जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना आहे. शेतकरी कुटुंबातील ३३ वर्षीय तरुणाच्या फुप्फुसात चार वर्षांपासून अडकलेली सुई शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात डॉक्टरांना अखेर यश आले. शहरातील एका खासगी रुग्णालयात एक तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे तरुणाला जीवदान मिळाले. जालना जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील हा तरुण असून चार वर्षांपूर्वी त्याने शिलाई मशिनची सुई तोंडात धरली असताना अचानक खोकला आला. त्यामुळे तोंडातील सुई थेट गिळली …
Read More »पटोले अडचणीत : नागपुरातून नानाविरोधात काँग्रेसच्याच दिग्गजांची ‘फिल्डिंग’!
✍️मोहन कारेमोरे शिक्षक मतदार संघाची निवडणूक जवळमोहन येत आहे. त्यादृष्टीकोनातून भाजप आणि काँग्रेसने कंबर कसली आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांना काँग्रेसने समर्थन जाहीर केले. मात्र, याविषयीची घोषणा माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्या माध्यमातून करण्यात आली. बैठकीनंतर झालेल्या या घोषणेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने …
Read More »‘जुनी पेन्शन’चा निर्णय विचारपूर्वक घेणार : फडणवीस
शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात निर्णय तडकाफडकी घेता येण्यासारखा नाही. हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. दहा वर्षांत अडीच लाख कोटींवर हा खर्च जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात स्पष्ट केले. नागपूर शिक्षक मतदारसंघातील भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारार्थ रेशीमबाग येथे आयोजित एका सभेत ते बोलत होते. खासदार कृपाल तुमाने, निवडणूक …
Read More »नागपुरात 200 पतंग जप्त,12 उड्डाणपूल बंद
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने नागपुरात पतंग शौकीनांच्या आनंदाला उधाण आले. रविवारी सकाळपासूनच आकाशात पतंगांची गर्दी झाली होती. अबालवृद्ध सारेच पतंग उडविण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. उपराजधानीतील प्रत्येक भागात आकाशातील पतंगांच्या गर्दीचे दृष्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. प्रत्येक गच्चीवर सकाळपासूनच अख्खे कुटुंब एकत्रित पतंग उडवण्याचा आनंद घेत आहे. महिला, युवती पतंग उडविण्याची हौस भागविताना दिसत आहे. पतंग उडवितानाच डीजेच्या तालावर नृत्याचाही आनंद घेत …
Read More »