नागपूर

राज ठाकरेंना धक्का,नागपूर जिल्हाध्यक्ष खंडणीत अडकल्याने मनसेची डोकेदुखी

नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर खंडणी प्रकरणात अडकल्याने राज ठाकरे यांना धक्का बसलाय. या प्रकरणामुळे मनसेची चांगलीच डोकेदुखी वाढू शकते. अशा खंडणीखोर पदाधिकाऱ्याला अटक झाल्याने पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी होऊ शकते. काही आठवड्यापूर्वी राज ठाकरेंनी विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ग्राऊंड लेव्हलवरची परिस्थिती जाणून घेतली होती.कार्यकारिणी बरखास्त केली आणि घटस्थापनेला नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याची घोषणा केली. …

Read More »

अधिवेशन : सरकार नागपुरात, नक्षलवादी सक्रीय

नागपुरात हिवाळी अधिवेशनाला आज, सोमवारपासून सुरुवात होत आहे. सरकार नागपुरात दाखल होताच, नक्षलवादी सक्रीय झाले आहेत. नक्षलवाद्यांनी सरकारला इशारा दिलाय. सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार त्वरित रद्द करण्यात यावा अन्यथा… सरकार सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार रद्द करणार नसेल तर आदिवासींचा हित पाहणाऱ्या सर्व घटकांनी एकत्रित सरकार विरोधात जनसंघर्ष उभारावा,असे आवाहनही नक्षलवाद्यांनी एका प्रेस रिलीजच्या माध्यमातून केला आहे. बंदी घालण्यात …

Read More »

नागपूर : गोळीबारात जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील कन्हान खाण परिसरातील गोळीबारात गंभीर जखमी जवानाचा अखेर कामठी येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. वेकोलीच्या खाण क्रमांक सहा परिसरात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेला मिलिंद समाधान खोब्रागडे (वय २९, मूळ रा. अकोला) याच्यावर कामठीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणात पोलिसांनी समीर सिद्दीकी (वय २९ रा. कॉलरी टेकडी) व राहुल …

Read More »

नागपूर जिल्हा परिषदेचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ : संगणक टायपिंगच्या निकाल वाटपात विलंब!

✍️विश्व भारत विशेष नागपूर जिल्हा परिषद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. आता संगणक टायपिंग (GCC-TBC) प्रमाणपत्राचे निकाल वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. मात्र, नागपूरच्या शिक्षण उपसंचालकांना दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी निकालाच्या कागदपत्रांची फाईल वाटप करण्यासाठी नागपूरच्या माध्यमिक विभागाकडे जमा करण्यात आली होती. पण, आजपर्यंत फाईल वाणिज्य टायपिंग इन्स्टिटयूटकडे वाटप करण्यात आली नसून नागपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाने इतका विलंब …

Read More »

नागपूर : समृद्धी महामार्गावर दोन कारचा अपघात

रस्त्यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी नवे पायाभूत सुविधा विकास महामंडळ; आणखी एका महामंडळाची भर, रस्त्यांवरील खड्डे जाणार का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे रविवारी लोकार्पण झाले. या महामार्गावरून वाहतूक सुरू झाली. मात्र, वाहनांच्या सुसाट वेगामुळे अपघाताची घटना घडली आहे. नागपूर -शिर्डी हे अंतर कमी झाले असले, तरी सुसाट वाहनांमुळे महामार्ग पोलिसांची चिंता वाढलीय. समृद्धी महामार्गावर पहिला अपघात सोमवारी झाला. वायफळ टोल नाक्यावर वेगाने येणाऱ्या मर्सिडीज कारने पुढच्या स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. …

Read More »

गडकरींना डावलण्याची मोदींची खेळी!

✍️मोहन कारेमोरे नागपुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्ग,मेट्रोसह विविध विकासकामांचे उदघाटन केले. समृद्धी महामार्ग बांधकामात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची महत्वाची भूमिका आहे. तितकीच नितीन गडकरी यांचीही. मात्र, नरेंद्र मोदी यांनी शिंदे आणि फडणवीस यांचे कौतुक केले. त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान दिसले. मात्र, गडकरी यांच्याकडे कानाडोळा केल्याचे दिसते. त्यामुळे येत्या काळात शिंदे आणि फडणवीस यांचे वजन वाढणार आहे. …

Read More »

नागपुरात रुग्णवाहिकेत सिलिंडरचा स्फोट

नागपुरातील मानेवाडा बेसा परिसरातील रेवतीनगरमध्ये शुक्रवार दुपारी एका उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतील २ ऑक्सिजन सिलिंडरचा एकाचवेळी स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कशी घडली घटना? रेवतीनगर येथे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास रुग्णवाहिकेतील २ ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर बॉम्बसारखा आवाज ऐकू आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लोक घराबाहेर …

Read More »

चंद्रपूर : ताडोबात एक वाघिण,दोन वाघांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्याच्या बफरझोनमधील शिवनी व मोहरली वनपरिक्षेत्रात एक वाघ व एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बुधवारी एका वाघीणचा मृत्यू झाला होता. वनविभागाचे अधिकारी , कर्मचारी गस्त घालत असताना मृतावस्थेत वाघ व बछडा आढळून आले. ताडोबाच्या बफर झोनमधील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू सुमारे २०-२५ दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. मृतावस्थेतील वाघ खूप …

Read More »

शिंदे सरकारला पडला विसर : बुद्धिस्ट पर्यटन सर्किटमध्ये वेरूळ, अजिंठा लेण्यांचा समावेशच नाही

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित स्थळे व बुद्धिस्ट स्थळांचा समावेश असलेल्या पर्यटन सर्किटचा शुभारंभ शनिवारी झाला. मात्र औरंगाबाद शहरातील बौद्ध लेणी व जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त असलेले वेरूळ, अजिंठा येथील बौद्ध लेण्यांचा या सर्किटमध्ये समावेश करण्याचा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना विसर पडला आहे. तर नागपुरातील दीक्षाभूमीचा यात समावेश करण्यात आलाय. औरंगाबादेतील मिलिंद कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा …

Read More »

नागपुरातील कळमना बाजारात आग

नागपुरातील प्रसिद्ध कळमना बाजारमधील मिरची बाजारातील एका यार्डला आज बुधवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास आग लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात प्रामुख्याने 7 ते 10 अडतीया व व्यापाऱ्यांचा माल होता. या आगीत 5 कोटींच्या जवळपास नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Read More »