Breaking News

प्रशासन

पत्रकारांसोबत बिनसले आणि जिल्हाधिकाऱ्यांची बदली : मुख्यमंत्र्यांवरही आली होती आफत

बऱ्या आणि चुकीच्या अशा दोन्ही घटनांमुळे सतत चर्चेत असणारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बुधवारी बदली झाली.अमोल येडगे हे कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत. अमोल येडगे हे २०१४ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. कळमनुरी (जि. हिंगोली) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. तसेच आयटीडीपीचे प्रकल्प संचालक म्हणूनही काम केले आहे. जिल्हाधिकारी …

Read More »

सुट्टीपासून शासकीय कर्मचारी वंचित : मराठा आरक्षणासाठी नागपूर विभागात 29 हजार कर्मचारी नियुक्त

राज्य मागासवर्ग आयोगामार्फतच्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी विभागात 29 हजार 42 प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सर्वेक्षणासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणासंदर्भात उच्चस्तरीय आढावा घेतली. दि. 31 जानेवारी पर्यंत सर्वेक्षणाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. विभागातील 64 तालुक्यातील …

Read More »

अधिकाऱ्याचा शाही वाढदिवस चर्चेत : तीन कर्मचाऱ्यांना नोटीस

आदिवासी विकास विभागातील उपायुक्त सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस बुधवारी कार्यालयात शाही थाटात साजरा करण्यात आला. साहेबांचे आगमन झाल्यानंतर कोल्ड फायरच्या आतषबाजीने कार्यालय उजळून निघाले. ‘बॉस’ उल्लेख असणारा केक कापला गेला. हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कंबर कसली होती. या घटनेची गंभीर दखल घेत आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आदिवासी विकास विभागाचा कारभार वेगवेगळ्या कारणांनी …

Read More »

नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवडणूक आयोगाचा पुरस्कार

✍️मोहन कारेमोरे भारत निवडणूक आयोगाकडून आज निवडणुकीच्या सुधारणासंदर्भात जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना ‘बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 ‘ घोषित करण्यात आला आहे. निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढविण्यासाठी डॉ. विपिन इटनकर यांनी ‘मिशन युवा ‘ अभियान राबविले होते. या अभियानातर्गत त्यांनी 15 जुलै 2023 ते जानेवारी 2024 या काळामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला लक्षात घेऊन …

Read More »

तलाठी भरतीविरोधात असंतोष : छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये लाखो परीक्षार्थी रस्त्यावर

तलाठी भरती परीक्षेतील कथित गैरप्रकार, गुणवत्ता यादीत आलेले ‘टीसीएस’मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि सर्व प्रकरांकडे होणारे दुर्लक्ष या विरोधात परीक्षार्थीनी छत्रपती संभाजी नगर आणि बीड शहरात मंगळवारी रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त केला. भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही? लोकसेवा आयोगामार्फत केवळ २९६ रुपये शुल्क आकारले जाते, मग खासगी कंपन्या अतिरिक्त शुल्क का घेतात? परीक्षेतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सरकार विशेष …

Read More »

नागपूर जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांनी का केले लेखणी बंद आंदोलन सुरु? वाचा

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तृतीय श्रेणी कर्मचारी सध्या लेखणीबंद आंदोलन करीत आहे. कळमेश्वर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर कारवाई करा ही त्यांची मागणी आहे. मंगळवारी त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. कळमेश्वरतहसील कार्यालयात प्रितम शेंडे महसूल सहायक पदावर कार्यरत आहेत. ते कार्यालयात काम करीत असताना त्यांना स्थानिक दोन नागरिकांनी त्रयस्तांच्या कामाबाबत विचारणा केली आणि “ कामकाज जमत नसेल तर राजीनामा …

Read More »

पोलीस अधिकाऱ्याची तक्रारदारास मारहाण?

न्याय प्रविष्ट एका कौटुंबिक प्रकरणातील तक्रारदार जितेंद्र आग्रोया यांना तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बोलावून उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याचा आरोप आग्रोया यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. १० जानेवारी रोजी हा प्रकार घडल्याचे सांगत या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या बँक खात्यातून बळजबरी पैसे काढल्याचा गंभीर आरोपही जितेंद्र आग्रोया यांनी यावेळी केला. संबधित उपविभागीय पोलीस …

Read More »

महसूल अधिकाऱ्यांनी मागितले पैसे?: वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या पथकावर हल्ला

वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना केल्याने तस्कर चवताळले आहेत. ते अधिकाऱ्यांना घाबरवण्याचे प्रयत्न करू लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वाळू डेपो सुरू करून माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे चोरटी वाळू विक्री रोखण्यासाठी कारवाई सुरू केली. …

Read More »

‘PWD’ परीक्षेत घोळ : ‘TCS’ कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी)काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत ‘टीसीएस’ कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी लातूरच्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. प्राथमिक तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली असून त्यामुळे संपूर्ण नोकरभरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत ‘टीसीएस’च्याच एका कर्मचाऱ्याच्या जवळच्या नातलगांची नावे असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. लातूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या …

Read More »

शासकीय कार्यालयात वास्तुशांतीसाठी केले होम हवन

भूमी अभिलेख कार्यालयात वास्तुशांतीसाठी पुजाऱ्याकडून होम हवन केल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र हे जादूटोणाविरोधी कायदा लागू करणारे पहिले राज्य आहे. मात्र, याच राज्यात चंद्रपूरातील शासकीय कार्यालयात होम हवन केल्या जात असल्याने सर्वत्र टीका होत आहे. राज्याला फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा आहे. असे असताना या कटिबद्धतेला शेंदूर फासून चक्क शासकीय कार्यालयात होमहवनचे थोतांड करण्यात आले. प्रशासकीय भवन येथील भूमी अभिलेख …

Read More »