नागपूर शहरातील उद्यानांची स्थिती योग्य असल्याचे सांगणाऱ्या नासुप्रच्या दाव्यांची महापालिकेच्या समितीने पोलखोल केली होती. तरीही, अजूनपर्यंत उद्याने दुरुस्त करण्यात आलेले नाही. वर्धा मार्गांवरील पर्यावरणनगर मधील उद्यानाचा वाली कोण? असा प्रश्न आहे. जेवण उद्यान शेवटच्या घटका मोजत आहे का? असे चित्र आहे. पर्यावरणनगरातील उद्यानाची जबाबदारी महापालिका की नागपूर सुधार प्रन्यासची, यावरूनही वाद आहे. महापालिकेला हस्तांतरित केलेल्या शहरातील ४४ उद्यानांपैकी केवळ तीन …
Read More »तहसील कार्यालयात उमेदवारांची गर्दी : पोलीस पाटील परीक्षेत घोळ
नागपूर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर घेण्यात आलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री, महसूल अतिरिक्त मुख्य सचिव आणि नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे कारेमोरे यांनी लेखी तक्रार दाखल केली. त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दनानले आहे. लिखित परीक्षेचे व मुलाखतीचे गुण वेगवेगळे घोषित न केल्याने यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा …
Read More »तहसीलदारांना पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण
अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत तहसीलदारांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, वादातील रस्त्याची पाहणी करण्यासाठी तहसीलदार संजय बिरादार यांच्यावर एका गटाने हल्ला चढवत मारहाण केल्याची घटना नेवासा येथे घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोठा पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडल्याने जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तहसीलदार बिरादार यांच्या …
Read More »मोहन कारेमोरे यांची राज्य सरकारकडे तक्रार : नागपूर जिल्ह्यात पोलीस पाटील भरतीत घोळ!
नागपूर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर अलिकडेच घेण्यात आलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री, महसूल अतिरिक्त मुख्य सचिव आणि नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे कारेमोरे यांनी लेखी तक्रार दाखल केली. लिखित परीक्षेचे व मुलाखतीचे गुण वेगवेगळे घोषित न केल्याने यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. …
Read More »बेरोजगार अभियंत्यांची ‘पीडब्लूडी’ कार्यालयावर धडक
महाराष्ट्र इंजिनीअर असोसिएशनशी संलग्नीत सुशिक्षीत बेरोजगार अभियंता कंत्राटदार असोसिएशनच्या स्थानिक शाखेच्यावतीने आज, मंगळवार, 29 ऑगस्ट रोजी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. निवेदन देऊन शासन निर्णयाप्रमाणे विविध विकास कामांपैकी 33 टक्के कामे सुशिक्षीत बेरोजगार अभियंता कंत्राटदारासाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी एक स्वतंत्र कक्ष उपलब्ध करुन देण्याचा आग्रहसुद्धा यावेळी करण्यात आला. शासन निर्णयाप्रमाणे …
Read More »सोयगाव तहसीलदारांच्या मुलाकडून सरकारी गाडी पळवत स्टंटबाजी : औरंगाबादमध्ये गुन्हा
कॅनॉटमध्ये अंबरदिवा लावलेली अन् विना क्रमांकाची बोलेरो सायरन वाजवित बेदरकारपणे पळविणाऱ्या हुल्लडबाज तरुणांना औरंगाबादच्या (संभाजीनगर) सिडको पोलिसांनी पकडले. ती गाडी सोयगाव तहसीलदारांची असल्याची माहिती समोर आली. तहसीलदाराच्या मुलाने मित्रांना सोबत घेऊन ही स्टंटबाजी केल्याचे स्पष्ट झाले. चालक मुलाकडे लायसन्सही नव्हते. पोलिसांनी ही गाडी जप्त केली. २२ ऑगस्टच्या मध्यरात्री साडेबारा वाजता कॅनॉट भागात हा प्रकार घडला, असे सूत्रांनी स्पष्ट केले. अधिक …
Read More »18 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
मतदान नोंदणीचे काम करण्यात टाळाटाळ केल्याप्रकरणी १८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सोलापूर शहरातील कुंचल प्रशाला आणि त्र्यंबकेश्वर प्रशालेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उपविभागीय अधिकारी क्रमांक एक सदाशिव पडदूणे यांच्या आदेशानुसार उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैपन नदाफ यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दि १/ १ / २०२४ या …
Read More »तहसीलदारांचा ऑनलाईन सर्विस सेंटरवर छापा : जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल
शासकीय अधिकाऱ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीचे बनावट कागदपत्रं तयार करुन नागरिकांकडून ते अव्वाच्या सव्वा शुल्क आकारत होते. अशा बनावट व्ही.एस. ऑनलाईन सर्विस सेंटरचा काळाबाजार उजेडात आला. याप्रकरणी वर्धा महसूल विभागासह पोलिसांच्या चमूने ऑनलाईन सेंटरवर कारवाई करुन चौघांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रांसह लॅपटॉप आणि महागडी कार असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई प्रशासकीय इमारतीच्या समोरील रस्त्यावर करण्यात आली. पोलिसांनी …
Read More »80 इमारती धोक्याच्या, नोटीस एकालाच
जळगाव मधील भुसावळ शहरात ८० जीर्ण इमारती उभ्या आहेत. संभाव्य दुर्घटना टाळावी यासाठी पालिकेने संबंधित इमारत मालक, भाडेकरूंना आतापर्यंत दोनवेळा नोटीस बजावली. पण, या नोटीसला संबंधितांनी केराची टोपली दाखवली. आता गेल्या आठवड्यात प्रांताधिकारी तथा पालिका प्रशासक जितेंद्र पाटील यांनी फक्त एकाच जीर्ण, पडावू इमारत मालकास नोटीस बजावली. त्यामुळे इतरांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जीर्ण इमारती पडून जीवित हानी …
Read More »तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न : नागपुरात उपचार सुरु
वाळूची अवैध वाहतूक रोखणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील एका तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरण मोरे (35) असे जखमी तलाठ्याचे नाव आहे. त्यांच्यावर नागपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवनी तालुक्यात वाळूची अवैध तस्करी सुरू असल्याची माहिती प्रशासनाला …
Read More »