Breaking News

प्रशासन

तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित : खळबळ

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील कढोली (खुर्द)ग्राम पंचायत सरपंच आणि दोन सदस्य अपात्र झाल्यानंतर त्यांच्या अपिलाची 15 दिवसांची मुदत असताना,त्यापूर्वी सरपंच निवड सभा घेऊन नवीन सरपंच निवड करण्यात आली होती.त्यामुळे उपसरपंच डॉ. विनायक डोहे यांनी राज्याचे वने,मत्सय व्यवसाय, सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र देऊन कोरपना तहसीलदारांनी लावलेली सरपंच निवड सभा रद्द करावी तसेच तहसीलदाराचे त्वरित निलंबन करावे,अशी …

Read More »

निवडणुकीपूर्वी ‘पीडब्लूडी’ विभागात कोट्यवधींच्या कामांना परवानगी : राज्यपालांकडे चौकशीची मागणी

2024 च्या विधानसभा निवडणुकीआधी अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या ६७३८ कोटी रुपयांपेक्षा बांधकाम विभागाने रस्ते आणि पुलांसाठी सुमारे ९० हजारा कोटींपेक्षा जास्त रकमेच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या कामांमध्ये अनियमितता झाली असल्याचा आरोप करीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे पत्राद्वारे चौकशीची मागणी केली आहे.   ‘कमाई चाराणे आणि खर्च बारणे’ असा टोला लगावत दानवे म्हणाले, …

Read More »

वनकर्मियों को रेत माफिया ने बेरहमी से पीटा, जान बचाकर भागना पडा

वनकर्मियों को रेत माफिया ने बेरहमी से पीटा, जान बचाकर भागना पडा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   कवर्धा। छत्तीसगढ़ के कवर्धा जिले में अब वन विभाग की टीम पर हमला हो गया। रेत माफिया ने अफसरों को दौड़ा-दौड़ाकर पीटा। लाठी-डंडे से उनका सिर फोड़ दिया। जान से मार डालने की धमकी दी। किसी तरह वनकर्मी जान बचाकर भागे, लेकिन …

Read More »

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार करतात सुरक्षा रक्षक, रिक्षा चालकाचे काम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ने मार्च २०२४ मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२च्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. मात्र, काही उमेदवार याविरोधात न्यायालयात गेल्यामुळे त्यावर स्थगिती येऊन नियुक्त्या रखडल्या होत्या. आता सर्व याचिका निकाली निघाल्या असून न्यायालयाने फेरनिवड यादी जाहीर करण्यावर कुठलीही बंधने घातलेली नाही. असे असतानाही ‘एमपीएससी’ने अद्याप फेरनिवड यादी जाहीर न केल्यामुळे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि अन्य महत्त्वाच्या …

Read More »

वनपरिक्षेत्राधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल : ६६ लाखांची अपसंपदा

गडचिरोलीत वनपरिक्षेत्राधिकाऱ्यास सहकारी महिला कर्मचाऱ्याकडून पावणे दोन लाखांची लाच स्वीकारताना अटक केली होती. उघड चौकशीत त्याने मोठ्या प्रमाणात अपसंपदा जमविल्याचे स्पष्ट झाले. अखेर २० सप्टेंबरला त्याच्याविरुध्द असपंदेचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच्या पत्नीलाही आरोपी केले आहे. दिवाकर रामभाऊ कोरेवार असे त्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव असून तो सध्या पालघरच्या पाली (ता. वाडा) वनविभागात कार्यरत आहे. दिवाकर कोरेवार हा वडसा वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी …

Read More »

नागपुरच्या प्रभारी विभागीय आयुक्त पदी डॉ. विपीन इटनकर!आज स्वीकारणार पदभार

अमेरिका येथील जॉन एफ. कॅनडी स्कुलतर्फे आयोजित डिस्टिंग्विश्ड हम्फ्रे फेलोशिप प्रोग्राम ‘लिडरशिप फॉर २१- सेंचुरी’ या कार्यक्रमासाठी नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड झाली आहे. या फेलोशिपसाठी भारतातून त्या एकमेव अधिकारी आहेत. वॉशिंग्टन, डी.सी.येथे सरकारमधील किंवा सरकारबाहेरील वरिष्ठ व्यावसायिकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या तीन आठवड्यांचा फेलोशिप प्रोग्राममध्ये, गंभीर समस्या असलेल्या क्षेत्रांमध्ये धोरण-स्तरीय जबाबदाऱ्या, नेतृत्व विकास सुलभ करणे, योग्य …

Read More »

२४ उपजिल्हाधिकाऱ्यांना नियमबाह्य बढती : मुख्य सचिवांकडे तक्रार

२४ उपजिल्हाधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत बढती देण्याचा प्रस्ताव दाखल करताना नियम डावलले असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य अधिकारी संघटनेसह तीन संघटनांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. पदोन्नतीसाठी महाराष्ट्र महसूल सेवेस केंद्र सरकारने राज्य नागरी सेवा म्हणून मान्यता असणे अनिवार्य आहे. मात्र, तशी कागदपत्रेच उपलब्ध नाहीत. केवळ आठ वर्षांची उपजिल्हाधिकारी म्हणून केलेली सेवा पदोन्नतीसाठी पुरेशी नाही, असा आक्षेप नोंदवत बढतीचा प्रस्ताव …

Read More »

मुख्य सचिव पदावरून सुजाता सौनिक यांना हटविणार?

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांनी जेमतेम महिनाभरापूर्वी जबाबदारी स्वीकारली. महिना पूर्ण होण्याआधीच सौनिक यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहेत. विशेष म्हणजे, सौनिक यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्याआधी त्यांच्या बदलीच्या हालचालींना वेग आला असून गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल यांची मुख्य सचिवपदी वर्णी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेटिंग लावली आहे का, असा सवाल युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे …

Read More »

बदल्यांसाठी किती पैसे दिले? मंत्री काय म्हणाले?

राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये बदल्यांसाठी गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात स्पष्टीकरण जाहीर करत सर्व आरोप खोडून काढले आहेत. बदल्याच होणार नसल्याने अशा आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागामध्ये २०२४ मध्ये कोणाची बदली करण्याचा प्रश्नच नव्हता. बदल्याच होणार …

Read More »

तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या ‘पीडब्लूडी’ अधिकाऱ्याला अटक

लग्नाचे आमिष दाखवत ३० वर्षीय तरुणीचे मागील ७ वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील(पीडब्लूडी)अधिकारी योगेश पाटील या तरुणाला पोलिसांनी तरुणीच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करत अटक केली आहे. तो अलिबाग येथे कार्यरत आहे.   योगेश पाटील याने सात वर्षे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर तरुणीची योगेश पाटील याच्याशी मैत्री झाली …

Read More »