Breaking News

प्रशासन

कृषीमंत्र्याच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात भ्रष्टाचाराचं पीक : महसूल, कृषी विभागाकडून सामान्यांची गळचेपी

✍️मोहन कारेमोरे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघामध्येच कृषी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने याप्रकरणी तीन जणांना रंगेहात पकडले आहे. यात तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादुर, मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे, कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे आणि कृषी अधिकारी बाळासाहेब संपतराव निकम यांना 24 हजार 500 रुपये घेताना रंगेहात अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंध …

Read More »

अमरावतीत बदली घोटाळा : 200 कर्मचाऱ्यांची होणार चौकशी, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे

जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत सोयीच्या ठिकाणी बदली आणि पदस्थापनेसाठी अनेक शिक्षकांनी दुर्धर आजार तसेच अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्रांचा आधार घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी अमरावती विभागीय आयुक्‍त निधी पांडे यांना निवेदन दिले. बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बदली घेणाऱ्या अमरावती विभागातील दोन हजारावर शिक्षकांच्या कागदपत्रांची चौकशी व वैद्यकीय तपासणी करण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त …

Read More »

संपाचा फटका : शनिवार, रविवारी शासकीय काम करा

जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी १४ ते २० मार्च या कालावधीत केलेल्या संपामुळे आर्थिक कामकाज ठप्प झाले होते. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी (२५ आणि २६ मार्च) कार्यालय सुरू ठेवावे, असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुंबईच्या शिक्षण निरीक्षकांना या संदर्भातील सूचना गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या. आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये …

Read More »

कोणी दिला दगा?महाराष्ट्राला वेठीस ठेवून कर्मचाऱ्यांना काय मिळाले?

जुनी पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी मागील 7 दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपामुळे राज्यातील शासकीय रुग्णालय ते निमशासकीय कर्मचारीही संपात सामील झाले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठे हाल सहन करावे लागले. या संपामुळे आमदार ते सर्वसामान्यांच्या टीकेला सुद्धा कर्मचाऱ्यांना सामना करावा लागला. मुख्यमंत्री शिंदेंनी आश्वसन दिल्यानंतर हा संप मागे घेतला. पण, या 7 दिवसांच्या संपातून कर्मचाऱ्यांच्या हाती काय लागले? हा …

Read More »

मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघा न? : गारपिटीचा पिकांना तडाखा,संपामुळे पंचनामे रखडले

राज्याला गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसत आहे. सलग दोन दिवस सुरू गारपिटीमुळे राज्याच्या अनेक भागांतली पिकं मातीमोल झाली. मराठवाड्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला. अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात सहा तर विदर्भात एक बळी गेला. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडले. लातूर वादळी वाऱ्यासह गारपीट झालीय. आणि त्याचा …

Read More »

संपामुळे महसुलात मोठी घट : दस्त नोंदणी निम्म्यावर

कर्मचाऱ्यांच्या संपाचा दस्त नोंदणीला मोठा फटका बसला आहे. राज्यभरातील, विशेषत: ग्रामीण भागांतील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांत कर्मचारी नसल्याने दस्त नोंदणी निम्म्यावर आली आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्काच्या रुपाने मिळणाऱ्या महसुलात मार्चमध्ये घट होईल. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी करण्यात येते. त्यातून मुद्रांक शुल्काच्या रुपात राज्याला मोठा महसूल मिळतो. जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी …

Read More »

‘पीडब्लूडी’सचिव दशपुत्रे यांनी स्वीकारला पदभार : मोहन कारेमोरे यांनी केले स्वागत

नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दशपुत्रे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी) सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी अलीकडेच दशपुत्रे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) सचिव प्रशांत नवघरे यांचे अलीकडेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या जागेवर दशपुत्रे यांनी पदभार स्वीकारला आहे.

Read More »

‘जुन्या पेन्शन’वर फडणवीस यांचे मोठे विधान

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या विरोधात नाही. आज आम्ही निर्णय घेतला तरी आमच्यावर लगेच बोजा येणार नाही; पण राज्य म्हणून विचार करावाच लागेल. त्यामुळे जुन्या पेन्शनबाबत विचार करून निर्णय घ्यावा लागेल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारने अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करून त्याची पूर्तता केली जाईल. याशिवाय याबाबतचा कृती अहवाल पुढील वर्षी फेब्रुवारी, …

Read More »

नागपुरात संपामुळे 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमूदत संप पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. तब्बल 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी कालपासून संपावर गेले आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णालयांना बसला असून संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नागपूरात आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने सर्वसामान्यांना फटका बसला आहे. नागपुरात संपामुळे 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. मेयो, मेडिकलमधील तपासण्यांना ब्रेक देण्यात आला आहे.

Read More »

संपातून माघार : आजपासून काही संघटना कामावर

जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सकारात्मक असल्याने या संपातून माघार घेत असल्याची घोषणा राज्यातील प्राथमिक शिक्षकांची शिखर संघटना ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जाहीर केले.जुनी पेन्शन योजना राबविण्यासाठी सरकारला वेळ देण्यास संघाची तयारी असल्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी सांगितले. त्याचबरोबर आरोग्य संघटनांनीही या संपातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री …

Read More »