विश्व भारत ऑनलाईन : रेल्वेने प्रवाशांना ऐन दिवाळीत धोका दिलाय. रेल्वे विभागाने मंगळवारी देशभरातील विविध स्थानकांवरून सुटणाऱ्या १७७ प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.रद्द केलेल्या ट्रेनमध्ये पॅसेंजर ट्रेन सह मेल आणि एक्सप्रेस ट्रेनचा समावेश आहे. आयआरसीटीसी तसेच रेल्वे तिकीट काउंटर वरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाश्यांना भाडे परतावा दिला जाणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. खराब हवामान आणि रेल्वे रुळाच्या देखभालीच्या …
Read More »दुर्लक्ष : ग्रामीण भागात रस्त्यांची दैना , 5 किलोमीटर ये-जा करनेही कठीण
विश्व भारत ऑनलाईन : सर्वच जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांची देखभालही होत नाही. गावातील खराब रस्त्यांवर जर लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने नजर ठेवली तर कदाचित त्यांनाही नवसंजीवनी मिळू शकेल. परिसरातील अनेक रस्त्यात खड़े पडले आहेत. अनेक रस्ते पूर्ण उखडल्याने रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. या मार्गावर डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गावातील रस्त्यांचे …
Read More »दिवाळी : एसटीचे तिकीट 10 टक्क्यांनी वाढणार ; पासधारकांना वगळले
विश्व भारत ऑनलाईन : महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना ऐन दिवाळीत एसटी महामंडळाने भाडेवाढ करून जोरदार दणका दिलाय. दिवाळीत दहा टक्क्यांनी तिकीट महागणार आहे.महामंडळाने महसूल वाढीसाठी ही भाडेवाढ केली. अशी आहे भाडेवाढ… एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही 20.10.2022 व 21.10.2022 रोजीच्या …
Read More »आता घरीच मिळवा ड्रायव्हिंग लायसन ; ऑनलाइन अर्ज कसा करावा?
विश्व भारत ऑनलाईन : वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स अत्यंत आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास MV-Act अंतर्गत तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. तसेच, जर तुम्ही लायसन्सशिवाय गाडी चालवताना पकडले गेलात तर तुम्हाला मोठा दंडही भरावा लागू शकतो. याच कारणामुळे भारतात दर महिन्याला हजारो लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. तुम्हाला अशा लायसन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये जाण्याचीही गरज नाही. जसा …
Read More »दिवाळीत ट्रॅव्हल्स, रेल्वे फुल्ल : तिकीट दरही दुप्पट
विश्व भारत ऑनलाईन : दिवाळीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी होत असते. कोरोना नियंत्रणात आल्याने या वर्षी प्रवासाला पसंती दिली आहे. त्यामुळेच मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे १० नोव्हेंबरपर्यंतचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेची ही परिस्थिती पाहता खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी हात धुऊन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागपूरहुन पुण्याकडे जाणाऱ्या तिकीट दरात तब्बल दुपटीने वाढ करण्यात आली आहे. दिवाळीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या …
Read More »यवतमाळ-मुंबई बसला आग : नाशिकमधील घटना : चिमकुल्यासह 12 जणांचा बळी
विश्व भारत ऑनलाईन : नाशिकमध्ये एका खाजगी बसने अपघातानंतर पेट घेतला. यात एकूण 12 प्रवाशांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद रोडवरील कैलास नगर भागात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळवरून मुंबईला येत होती. पहाटे साडे पाच वाजता या बसला अपघात झाला. बसने पेट घेतल्याने एकूण 12 जणांचा होरपळून मृत्यू …
Read More »अमरावती-नागपूर-जबलपूर शनिवारपासून धावणार : सणासुदीत १७९ ‘स्पेशल ट्रेन’ची व्यवस्था
विश्व भारत ऑनलाईन : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.जबलपूर-नागपूर-अमरावती ही रेल्वे उद्या शनिवारपासून सुरु होत आहे. तसेच देशभरात सणासुदीचे काळ सुरू आहे. अशावेळी नोकरी, व्यवसायानिमित्त आपले गाव सोडून इतर राज्यात गेलेल्यांना सण साजरा करण्यासाठी सहजरित्या आपल्या घरी जाता यावे, म्हणून रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष सोय केली आहे. रेल्वे विभागाने सणासुदीनिमित्त या वर्षी छठपूजेपर्यंत १७९ पेअर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या …
Read More »7 हजार एसटी वाढणार, डिझेलऐवजी विद्युत, सीएनजी बस
विश्व भारत ऑनलाईन : प्रवासदर्जा उंचावण्यासाठी एसटी महामंडळाने सीमोल्लंघन करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळ नफ्यात आणण्याकरीता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘एसटी पुनरुज्जीवन आराखड्या’ची अंमलबजावणी सुरू केलीय. खर्च कमी करण्यासाठी भाडेतत्त्वावरील गाड्यांवर भर आणि डिझेलवरील अवलंबित्व संपवण्यासाठी विद्युत, सीएनजी गाड्यांचा यात समावेश आहे. चार वर्षांत टप्याटप्याने सात हजार गाड्या घेत एसटी ताफा २२ हजारापार नेण्याचे महामंडळाने नियोजन केले आहे. असे नियोजन …
Read More »नागपुरच्या धर्तीवर औरंगाबादेत मेट्रो धावणार … वाचा सविस्तर
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर मेट्रोचा कायापालट करणाऱ्या महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची नवी दिल्लीत भेट घेत औरंगाबाद शहराच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अहवालासंबंधी सविस्तर माहिती घेतली. विशेष म्हणजे महामेट्रोला औरंगाबाद शहराकरिता मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्य देण्यात आले. नागपूरच्या धर्तीवर… डॉ. दीक्षित यांनी प्रस्तावित डीपीआरच्या स्थितीबाबत …
Read More »भूसंपादन न करता तयार झाला रस्ता, शेतकऱ्यांची ओरड…. वाचा
विश्व भारत ऑनलाईन : शेताच्या बाजूने रस्ता तयार करायचा असल्यास भूसंपादन प्रक्रिया केली जाते. मात्र, किरकोळ भूसंपादन करून रस्ता तयार केल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे. सातारा जिल्ह्याला वेगवान करण्यासाठी अनेक राष्ट्रीय महामार्ग झाले. पुणे- बेंगलोर या 4 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला तर आशियाई महामार्ग 47 म्हणून मान्यता देखील मिळाली. आता सातारा- लातूर हा महामार्ग रस्ते विकास महामंडळाने गेल्या तीन वर्षात तयार …
Read More »