Breaking News

मुंबई

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राचे पथक महाराष्ट्रात दाखल

मुंबई/नवी दिल्ली- देशात दररोज आढळून येणार्‍या नव्या बाधितांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वाटा असणार्‍या महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राचे उच्चस्तरीय पथक आज शनिवारी राज्यात दाखल झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाला हे पथक आवश्यक ते सहकार्य करणार आहे. देशात आज कोरोनाचे सुमारे 18 हजार नवे बाधित आढळून आले. त्यातील दहा हजारांवर बाधित एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने केंद्र सरकारने …

Read More »

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

एनआयएकडे तपास द्या सभागृहात भाजपची जोरदार मागणी सचिन वाझे संशयाच्या भोव-यात दोन्ही गाड्या ठाण्यातील एटीएसकडे सोपवला तपास मुंबई (प्रतिनिधी) : रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील एंटीलियाबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पियो गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. या प्रकरणावर आक्रमक झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात यावा, अशी …

Read More »

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 4 हजार 700 कोटी : विजय वडेट्टीवार

नागपूर : सरकारी मदतीची वाट पाहणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश आज काढण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल असे …

Read More »

हे सरकार आहे की ईस्ट इंडिया कंपनी?; आशिष शेलारांचा टोला

मुंबई: निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीवरून भाजपनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरूच ठेवली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा दाखला देत भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी राज्यातील सरकारला ईस्ट इंडिया कंपनी म्हणून हिणवले आहे. कंगना राणावत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राज्यात राजकीय वाद निर्माण झाला होता. शिवसेनेनं कंगना राणावत हिच्या विरोधात आघाडी उघडली होती. …

Read More »

उद्धव ठाकरे उद्या तुमचं गर्वहरण होईल, कंगनाने व्यक्त केला संताप

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यापासून वादाला सुरुवात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकी दिल्याचा आरोप करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यापासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेची झोड उठली आहे. यासोबतच मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवल्यानेही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर सोशल मीडियावर कंगनाला सेलिब्रेटींसह सर्वसामान्य मुंबईकरांनी कंगनाला ट्रोल केलं होतं. यावेळी कंगनाला काही जणांनी मुंबईत पुन्हा येऊ नको …

Read More »

मुंबईत येण्यापूर्वीच कंगनाला आणखी एक दणका; सिनेमॅटोग्राफरने चित्रपट करण्यास दिला नकार

…म्हणून पीसी श्रीराम यांनी चित्रपट करण्यास दिला नकार बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातच तिच्या मुंबईतील ‘मणिकर्णिका फिल्म्स’ या कार्यालयात बेकायदेशीर काम केल्यामुळे बीएमसीने तिला नोटीसदेखील बजावली आहे. बीएमसीने दिलेल्या या दणक्यानंतर कंगनाला आणखीन एक दणका बसल्याचं दिसून येत आहे. कंगनाची मुख्य भूमिका असलेला …

Read More »

आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम प्रवेश 70:30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धती रद्द

🔹‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ असणार वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे सूत्र 🔸वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची विधीमंडळात घोषणा मुंबई(दि.8सप्टेंबर):- राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा आणि 30 टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी प्रवेश करण्यात येत होते. मात्र आता 70 : 30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धत रद्द करण्यात आली असल्याने ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ अशी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया …

Read More »

“अभिनंदन भारत!”; मुलाच्या अटकेनंतर रियाच्या वडिलांनी सोडलं मौन

शोविक चक्रवर्तीच्या अटकेनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडील व निवृत्त लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. “अभिनंदन भारत”, असं म्हणत त्यांनी या अटकेचा निषेध व्यक्त केला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने शनिवारी शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चित्रपटसृष्टीशी निगडित व्यक्तींना शोविक अमली पदार्थ पुरवत होता, असा संशय अमली पदार्थविरोधी पथकाला आहे. शोविकनंतर रियावरही अटकेची …

Read More »

कोणतीही लस ५० टक्केही प्रभावी नाही; WHO ने सांगितले ‘हे’ कारण!

करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. करोनाला अटकाव करणाऱ्या लशीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही लशींची चाचणी ही तिसऱ्या टप्पात पोहचली आहे. तर, रशियाने जगातील पहिली करोना प्रतिबंधक लस ‘स्पुटनिक व्ही’ विकसित केल्याचा दावा केला आहे. या दरम्यानच जागतिक आरोग्य संघटनेने लशींबाबत पुन्हा एकदा इशारा दिला आहे. सध्या चाचणी सुरू …

Read More »

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे!

सदस्यांना कोरोना चाचणी बंधनकारक मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानंतर ७ सप्टेंबरपासून अधिवेशन घेण्यात यावा, असा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. सत्ताधा-यांनी अधिवेशन २ दिवसांचे असावे, असा प्रस्ताव मांडला. यावर अधिवेशनात सविस्तर चर्चा व्हावी यासाठी अधिवेशन किमान ४ दिवसांचे असावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अखेर २ दिवसांच्या अधिवेशनाला सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने मंजुरी दिली, अशी माहिती …

Read More »