Breaking News

नागपुरात 25 कोटींची फसवणूक, तर कुठे 2 कोटींचा दरोडा

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
नागपूर पोलिसांनी २५ कोटींहून अधिक रकमेच्या फसवणुकेचे हायप्रोफाईल प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला आहे. नागपुरातील सोशल मीडियाचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे अजित गुणवंत पारसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अजित गुणवंत पारसेने डॉक्टरांना साडेचार कोटींचा गंडा घातला आहे असंही समोर आलं आहे.

Advertisements

डॉक्टरला गंडा

Advertisements

नागपूर शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरला अजितने सुमारे साडेचार कोटी रुपयांना फसवल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी छापा टाकला. झडतीमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांचे लेटरपॅड, सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांचे शिक्के सापडले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. सध्या साडेचार कोटींची फसवूणक उघडकीस झाली असली तरीही ही रक्कम २५ कोटींपेक्षा जास्त असू शकते असं पोलिसांचं म्हणणं आहे.

केंद्र सरकारकडून निधी देण्याचे आमिष

आरोपी अजित गुणवंत पारसे (४२) हा स्वावलंबी नगर येथील रहिवासी आहे. सोशल मीडिया तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांना त्याने फसवलं. पंतप्रधान कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने डॉक्टरांकडून दीड कोटी रुपये वसूल करण्यात आले. काही दिवसांनी अजितला डॉक्टर मित्राने कर्ज घेतल्याचे कळले, त्यात डॉक्टर हा गॅरेंटर आहे.

यानंतर त्याने सीबीआयच्या नावाने डॉक्टरला बनावट वॉरंट पाठवले. घाबरलेल्या डॉक्टरांनी हा प्रकार अजितला सांगितल्यावर त्याने केस सेटलमेंटच्या नावाखाली डॉक्टरकडून दीड कोटी रुपये वसूल केले आणि रक्कम मिळाल्यानंतर वॉरंट रद्द करण्याचे पत्र पाठवले.

कुटुंबियांनाही चुना

अजितसोबतच्या कौटुंबिक नात्यामुळे त्याला डॉक्टर मुरकुटे आणि त्यांचे नातेवाईक चांगले मानत होते. अजितला एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. या समारंभात डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीने मुलाला दत्तक घेतल्याचे अजितला समजले. याबाबतही अजितने डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला पत्र पाठवून गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी डॉक्टरांकडून दीड कोटी रुपये घेतल्याचीही माहिती मिळाली आहे.

पोलीसात धाव

फसवणूक लक्षात आल्यानंतर डॉक्टराची पोलिसात धाव
अजितकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अशाच प्रकारची फसवणूक आणखी एका डॉक्टराची केल्याचं समोर आलं आहे. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी अजितच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान पोलिसांना विविध पक्षांच्या नेत्यांचे लेटरपॅड आणि शिक्के सापडले. सदर पोलीस ठाण्याचा शिक्काही सापडला आहे. याप्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान अजित पारसे या आरोपीने विविध डॉक्टरांची 25 कोटींहून अधिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तो अनेक डॉक्टरांना मुंबईत किंवा अनेक ठिकाणी फिरायला घेऊन जायचा, परदेशी मुलींना खोलीत पाठवायचा. व्हिडीओ बनवून सेक्सटोर्शन करायचा.या डॉक्टरांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी करायचा. आरोपी रुग्णालयात दाखल असल्यामुळं अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
………..
लातूर शहरातील कातपूर रोड येथील व्यापारी आकाश अग्रवाल यांच्या घरी धाडसी दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांच्या रोकडसह ७३ लाखांचे दीड किलो सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. लातूर जिल्ह्यातील आजपर्यंत हा सर्वांत मोठा दरोडा मानला जात आहे.
………….

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात रेल्वे एक्सप्रेसमध्ये तरुणीसोबत केले अश्लील चाळे

गीतांजली एक्सप्रेसमध्ये विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या युवकाला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. विनोद सलगे (३५) रा. …

गर्भपात कराने वाले ताउ-चाचा गिरप्त में : पुलिस को आप बीती बताते हुए फुट-फुटकर रोई किशोरी

गर्भपात कराने वाले ताउ-चाचा गिरप्त में : पुलिस को आप बीती बताते हुए फुट-फुटकर रोई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *