Breaking News

नागपूर विमानतळावर कोटींचे सोने जप्त : खळबळ

Advertisements

नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवार (दि.१०) कतार एअरवेजच्या विमानाने आलेल्या एका आंतरराष्ट्रीय तस्कराकडून ३.३६ किलो सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत १.८० कोटी रुपये आहे.

Advertisements

मुंबई एनसीबीच्या पथकाला याविषयीची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी मंगळवारी (दि.९) रात्रीपासून विमानतळावर निगराणी ठेवली होती. हा प्रवासी विमानातून उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्या जीन्स पॅन्टच्या आत सात खिसे आढळून आले. यामध्ये पेस्टच्या स्वरूपात पाकिटामधून सोने तस्करी होत असल्याच्या प्रकार उघडकीस आला.

Advertisements

तिसरी घटना

एनसीबीच्या पथकाने त्याला पुढील कारवाईसाठी कस्टमच्या ताब्यात दिले आहे. सोने तस्करीची ही तिसरी घटना आहे. पहाटेच्या सुमारास येणाऱ्या कतारच्या विमानांमधून सोने तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुर के सिविल लाइंस और शंकर नगर में 25 मई से शुरू होगा स्मार्ट मीटर लगाने की शुरुआत

नागपुर के सिविल लाइंस और शंकर नगर में 25 मई से शुरू होगा स्मार्ट मीटर …

महिला से अनेक मर्तबा किया दुष्‍कर्म?अपराधी प्रॉपर्टी डीलर गिरफ्तार

महिला से अनेक मर्तबा किया दुष्‍कर्म?अपराधी प्रॉपर्टी डीलर गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट दिल्ली। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *